Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2026 | 02:08 PM
पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

Follow Us
Follow Us:

सोनाजी गाढवे/ पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यात तब्बल ३ हजार ८०८ जागा अद्याप भरायच्या बाकी असून, या जागांवर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २३ मेपर्यंत मुदत दिली आहे.

 

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यभरातील ८ हजार ७०१ शाळांमधील १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले होते. संगणकीय सोडतीद्वारे १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ८ मे रोजी संपली.

मात्र, राज्यभरात केवळ ७९ हजार ८७१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यानंतर शिक्षण विभागाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील ८६ हजार ३४ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीतून प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.

रिक्त जगामध्ये पुणे शहर अव्वल

राज्यातील रिक्त जागांच्या आकडेवारीत पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. पुण्यातील ३ हजार ८०८ रिक्त जागांनंतर ठाणे येथे २ हजार ८७३, नागपूर येथे २ हजार २५९, छत्रपती संभाजीनगर येथे १ हजार ३६४, नाशिक येथे १ हजार ३३३ आणि मुंबई येथे १ हजार २०५ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील जागांची संख्या अधिक असल्याने प्रतीक्षा यादीतील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

फक्त ४६ प्रवेश

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, राज्यभरात आतापर्यंत ४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षण विभागाने पालकांना आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा : नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत; कठोर व पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी

या मेट्रो सिटीत सर्वात जास्त जागा रिक्त

पुणे – ३,८०८

नागपूर – २,२५९

छ. संभाजीनगर – १,३६४

नाशिक – १,३३३

अहिल्यानगर – ८२१

अमरावती – ५७६

ठाणे – २,८७३

मुंबई – १,२०५

बीड – ४७५

कोल्हापूर – ७०६

लातूर – ४९३

आता पर्यंतची आकडेवारी

प्रवेश अर्ज – २,८९,२८६

प्रवेश निवड यादी – १,०५८११

प्रतीक्षेत यादीत – ८६,०३४

प्रवेश झालेले विद्यार्थी – ७९,८७१

प्रतीक्षेत यादीत विद्यार्थ्यांचे प्रवेश – ४६

Web Title: More than 3000 seats are vacant for rte admission in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Admission News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

IGNOU चा मोठा निर्णय: आता अवघ्या १ वर्षात पूर्ण होणार मास्टर डिग्री; विद्यापीठाची खास सुविधा एकदा वाचाच
2

IGNOU चा मोठा निर्णय: आता अवघ्या १ वर्षात पूर्ण होणार मास्टर डिग्री; विद्यापीठाची खास सुविधा एकदा वाचाच

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.