Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Education : पदवी अभ्यासक्रमात मोठा बदल! चौथ्या वर्षासाठी महाविद्यालयांना प्रशिक्षण अनिवार्य

राज्यात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांना ऑनलाइन प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. NEP 2020 अंतर्गत हा बदल लागू करण्याता आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 01:35 PM
Maharashtra NEP 2020 Mandatory Training for College Principals, Professors

Maharashtra NEP 2020 Mandatory Training for College Principals, Professors

Follow Us
Follow Us:
  • शिक्षणात नवा टप्पा
  • पदवी अभ्यासक्रमात मोठा बदल
  • महाविद्यालयांना प्रशिक्षण 3 दिवसांचे प्रशिक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अमलबजावणीच्या दिशेने राज्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या अमलबजावणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उत्त्व शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, प्राध्यापकांसाठी ३ दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व संबंधितांचा सहभाग अनिवार्य राहणार असल्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) च्या अमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष लागू होत आहे. या नव्या टप्प्याची प्रभावी आणि एकसमान अमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेत लवचिकता, संशोधनाभिमुखता आणि विद्यार्थी-केंद्रितता वाढविण्यासाठी ही पुनर्रचना अत्यंत महत्त्वाची असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील वांनी नमूद केले, ‘क्रेडिट फ्रेमवर्क’, ‘मल्टिपल एंट्री अँड एक्झिट’ आणि ‘अकॅडमिक बैंक ऑफ क्रेडिट्स’ यांसारख्या तांत्रिक बाबींचे सखोल ज्ञान संस्थाप्रमुखांना व्हावे, तसेच अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी हे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पार केले.

कागदापासून स्क्रीनकडे झेप; ई-लायब्ररीमुळे वाचन संस्कृतीचा नवा अध्याय

इतर राज्येही महाराष्ट्राचा आदर्श घेतील: मंत्री पाटील

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच सलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून चौथे वर्ष लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

४ वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स व ऑनर्स विश रिसर्च’ च्या चौथ्या वर्षाच्या या निर्णयाची प्रभावी आणि यशस्वी अमलबजावणी झाल्यास देशातील इतर राज्येही महाराष्ट्राचा आदर्श घेतील, असा ठाम विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्य सरकार या धोरणाच्या यशस्वी अमलबजावणीसाठी पूर्णपणे सकारात्मक आणि कटिबद्ध भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सविस्तर मार्गदर्शन

या नव्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करून मंत्री चंद्रकात पाटील यांनी महासार्कचे अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. चर्चासत्रात महासार्कचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी यानी चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या तांत्रिक व प्रशासकीय अमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मान्यवरांची उपस्थिती

या चर्चासत्रास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्य सुकाणू समितीचे सदस्य प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी, तसेच राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उच्च शिक्षण संचालक प्रा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Education News: बाह्य संस्थेमार्फत शिक्षक देण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर, कोपरखैरणेतील CBSE ला मिळणार शिक्षक

Web Title: Nep 2020 maharashtra 4 year degree implementation training

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Maharashtra Education
  • Marathi News
  • NEP

संबंधित बातम्या

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!
1

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
2

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
3

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
4

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.