
tech
NHAI Hackathon 7.0: तुम्ही स्वत:ला तंत्रज्ञान क्षेत्रातील मास्टर मानता का? जर तुम्हाला आयटी(IT), कॉम्प्युटर सायन्स, एआय/एमएल (AI/ML), ॲप डेव्हलपमेंट इत्यादी विषयांचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही २ लाखापर्यंत बक्षिस जिंकू शकता. राष्ट्रीय माहामार्ग प्राधिकरणाने आयटी आणि टेक क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेद्वारांना ५० हजार ते २ रुपयांपर्यंत रोख बक्षिस दिले जाणार आहे.
एनएचआयने (NHAI) ‘हॅकाथॉन ७.०’ च्या सातव्या पर्वाचे आयोजन केले आहे. सुरक्षित, चेहरा ओळखणारी, अचूक आणि ‘लाईव्हनेस डिटेक्शन सिस्टीम’ (समोरासमोर प्रत्यक्ष व्यक्ती आहे की नाही हे ओळखणारी प्रणाली) विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच ही प्रणाली इंटरनेट नसलेल्या भागातही काम करू शकेल. अशा पद्धतीने ‘Datalake 3.0’ ॲपमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
एनएचएआयने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या चॅलेजची माहिती दिली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून २०२६ आहे. अशा परिस्थितीत पात्र विद्यार्थ्यांकडे नोंदणीसाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेद्वारांनी [https://hackathon.nhai.org/Hackathon/](https://hackathon.nhai.org/Hackathon/) या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज सादर करावा.
NHAI हॅकाथॉन ७.० हे एक असे आव्हान आहे. ज्याद्वारे उमेद्वारांना एक स्मार्ट मोबाईल सिस्टीम तयार करावी लागेल, जी इंटरनेटशिवाय देखील चेहरा ओळखू शकेल आणि फेक चेहरा पकडू शकेल. या प्रणालीद्वारे समोर असलेली व्यक्ती खरी आहे की, तिचा फोटो किंवा व्हिडिओ दाखवला जात आहे. हे अचूकपणे ओळखता आले पाहिजे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ही सिस्टीम पूर्णपणे ऑफलाईन काम करणारी असावी.
जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आव्हान पूर्ण करू शकता, तर तुम्ही यासाठी नोंदणी करू शकता. या चॅलेंजमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला २ लाख रुपये द्वितीय क्रमांकाला लाख १ रुपये आणि तृतीय क्रमांक मिळणाऱ्या उमेद्वाराला ५०,००० रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.