Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NITI Aayog Report: पदवी घेतल्यानंतरही नोकरी मिळणे कठीण का? नीती आयोगाच्या अहवालात झालेला खुलासा एकदा वाचाच

NITI Aayog Report: नीती आयोगाच्या अहवालानुसार देशातील केवळ ८.२५ टक्के पदवीधर योग्य नोकरीत आहेत. उच्च शिक्षण, बेरोजगारी आणि कौशल्य विकासाबाबतच्या महत्त्वाच्या शिफारसी नेमक्या काय जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 27, 2026 | 09:37 AM
niti aayog report

niti aayog report

Follow Us
Follow Us:

NITI Aayog Report: नीती आयोगाच्या नव्या अहवालाने देशातील उच्च शिक्षण आणि रोजगार बाजारपेठेतील मोठी दरी चव्हाट्यावर आणली आहे. अहवालानुसार, देशातील सर्व पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर १३ टक्के असून, महिला पदवीधरांमध्ये हा आकडा २०.४ टक्के आहे, जो राष्ट्रीय सरासरीच्या (३.२%) तुलनेत खूप जास्त आहे.

देशातील ३.४ कोटी पदवीपूर्व विद्यार्थ्यांपैकी २ कोटींहून अधिक विद्यार्थी बीए, बीएससी आणि बीकॉमसारख्या सामान्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये शिकत आहेत. या पदव्यांचा थेट नोकरीशी संबंध कमजोर असल्याने विद्यार्थ्यांना पदवी नंतरही अतिरिक्त कौशल्य मिळवण्याची गरज भासते. म्हणूनच पारंपरिक अभ्यासक्रम बदलून बी.ए. हॉस्पिटॅलिटी, बी.एससी. अप्लाइड टेक्नॉलॉजी आणि बी.कॉम. ॲनालिटिक्ससारखे रोजगारभिमुख विशेष कोर्सेस सुचवण्यात आले आहेत.

व्यवसायिक शिक्षणाकडे नकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन

कौशल्य विकासाबाबत समाजात अजूनही व्यावसायिक शिक्षणाला ‘दुसऱ्या दर्जाचे’ मानण्याची नकारात्मक मानसिकता आहे. याशिवाय, ४३ टक्के तरुण आणि ४७ टक्के महिला योग्य माहितीच्या अभावामुळे कौशल्य विकासापासून वंचित राहतात. अहवालानुसार, कोणतीही कौशल्य तालीम न घेणाऱ्या सामान्य पदवीधारकाचे सुरुवातीचे सरासरी मासिक वेतन सुमारे २२ हजार रुपये असते, तर कौशल्य विकास करणाऱ्यांचे वेतन २९ हजार रुपये असते.

DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; २ लाखांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज!

हा प्रारंभिक फरक १० वर्षांत ९.७ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. महिलांसमोर सुरक्षितता आणि मार्गदर्शनाचा अभाव यांसारखी अतिरिक्त आव्हाने आहेत. तसेच, १५ ते २९ वयोगटातील ८.७ कोटी तरुण NEET (Not in Education, Employment or Training) श्रेणीत येतात.

Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

स्थानिक गरजेनुसार अभ्यासक्रम बदलण्यास दिले प्राधान्य

सध्याच्या शिक्षण व कौशल्य प्रणालीमध्ये व्यापक बदलांची गरज वर्तवण्यात आली आहे. केवळ प्रवेशावर भर न देता प्रत्यक्ष रोजगाराचे परिणाम तपासले जाणे आवश्यक आहे. पीएमकेव्हीवाय (PMKVY) आणि पीएम इंटर्नशिप योजनांची योग्य माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवी. ओडिसाच्या ‘वर्ल्ड स्किल सेंटर’च्या धर्तीवर पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप (PPP) द्वारे कौशल्य विद्यापीठे स्थापन करणे आणि आयटीआय (ITI) संस्थांना स्थानिक गरजेनुसार आपले ट्रेड व अभ्यासक्रम बदलण्याचे प्रशासकीय स्वातंत्र्य देण्याची महत्त्वाची शिफारस नीती आयोगाने केली आहे.

Web Title: Niti aayog report higher education employment skilling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • education
  • Entertainment News
  • job controversy
  • Niti Aayog

संबंधित बातम्या

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
1

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर
2

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर

साखरपुडा मोडल्यानंतरही आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; इन्स्टावर दिली माहिती, म्हटले…
3

साखरपुडा मोडल्यानंतरही आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; इन्स्टावर दिली माहिती, म्हटले…

Scholarship Renewal 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्कॉलरशिप रिन्यूअलसाठी अर्ज आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार
4

Scholarship Renewal 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! स्कॉलरशिप रिन्यूअलसाठी अर्ज आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.