फोटो सौजन्य- एआय
Railway Apprentice Bharti 2026: रेल्वेने वेळोवेळो विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून, यावेळेस उत्तर पश्चिम रेल्वेने ‘ॲक्ट अप्रेन्टिस रिक्रूटमेंट २०२६’ अंतर्गत एकूण २००८ ट्रेनिंग स्लॉट जाहीर केले आहेत. या पदांसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, योग्य आणि इच्छुक उमेदवार ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. अर्ज रेल्वे रिक्रूटमेंट सेल, जयपूरच्या अधिकृत वेबसाइट rrcjaipur.in वर जाऊन करावा लागेल. ही भरती अप्रेन्टिस कायदा १९६१ अंतर्गत २०२६-२७ या सत्रासाठी केली जात असून, हे स्लॉट उत्तर पश्चिम रेल्वेच्या विविध विभाग आणि वर्कशॉपमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अजमेर, बिकानेर, जयपूर आणि जोधपुरशी संबंधित युनिट्सचा समावेश आहे.
या भरती मोहिमेत एकूण ८ युनिट्समध्ये २००८ ट्रेनिंग स्लॉट उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक ५८० स्लॉट जयपूर विभागासाठी आहेत, तर बिकानेर विभागात ५२४ आणि अजमेर विभागात ५०० स्लॉट आहेत. याशिवाय जोधपुर विभागात १३४, बीटीसी कॅरेज अजमेरमध्ये १०१, बीटीसी लोको अजमेरमध्ये ६९, कॅरेज वर्कशॉप बिकानेरमध्ये ३३ आणि कॅरेज वर्कशॉप जोधपुरमध्ये ६७ स्लॉट उपलब्ध आहेत. या स्लॉटमध्ये इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, मेसन, पाईप फिटर, डीझेल मेकॅनिक, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), मेकॅनिक टूल मेंटेनन्स आणि रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर यांसारख्या अनेक ट्रेडचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता: अप्रेन्टिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या राउंडिंगची अनुमती असणार नाही.
तांत्रिक पात्रता: उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) असणे आवश्यक असून, हे प्रमाणपत्र NCVT किंवा SCVT कडून जारी केलेले असावे.
12th Career Options: बारावी नंतर काय? कमी वेळेत आणि सहज मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दल एकदा वाचाच..
वयोमर्यादा: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६ नोव्हेंबर २०२६ रोजी किमान १५ वर्षे ते कमाल २४ वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना ५ वर्षे, इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षे आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांना १० वर्षांची सूट मिळेल.
या भरतीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांच्या निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. १० वी आणि संबंधित ट्रेडच्या आयटीआय (ITI) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाईल. दोन्ही परीक्षांमधील प्राप्तांकांची टक्केवारी गृहीत धरून युनिट, ट्रेड आणि कॅटेगिरीनुसार अंतिम निवड केली जाईल. समान गुण असल्यास जास्त वयाच्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
1. सर्वप्रथम रेल्वे रिक्रूटमेंट सेल जयपूरच्या rrcjaipur.in या वेबसाइटवर जावे लागेल.
2. वेबसाइटवर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागेल.
3. त्यानंतर लॉगइन करून अर्जामध्ये आपली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी लागेल.
4. मागितलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करून निश्चित केलेले अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
5. शुल्क यशस्वीरीत्या जमा झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा.






