एनसीबीमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 1 लाख 42 हजारांपर्यंत मिळेल पगार!
केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागामध्ये (एनसीबी) नोकरीची मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘विभाग अधिकारी’ पदाच्या एकूण 05 रिक्त जागांसाठी एनसीबीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
कधीपर्यंत आहे अर्ज करण्याची मुदत?
अंमली पदार्थ नियंत्रण विभागामध्ये ‘विभाग अधिकारी’ पदासाठीच्या अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जुलै 2024 असणार आहे. त्यामुळे आता जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी समजली जाते. त्यामुळे अशा उमेदवारांनी विलंब न करता दिलेल्या पत्यावर आवश्यक कागदपत्रासह आपला अर्ज सादर करायचा आहे.
संस्था : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
भरले जाणारे पद : विभाग अधिकारी
पद संख्या : 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066
वयोमर्यादा : 56 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर
मिळणारे वेतन : मासिक 44,900 ते 1,42,400 रुपये.
असा करा अर्ज :
– या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
– अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
अधिकृत वेबसाईट – narcoticsindia.nic.in






