Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC School : पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

महानगरपालिकेच्या शाळांमधील यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 11:02 AM
पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Follow Us
Follow Us:

-महानगरपालिकेच्या शाळांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा
-पालिका शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर
– बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी साधला गुणवंत विद्यार्थीबरोबर संवाद

नीता परब, मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या शालांत माध्यमिक म्हणजेच दहावीच्या (एसएससी) परीक्षेत महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महानगरपालिका मुख्यालयात शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी साेमवारी गाैरव केला. यावेळी विद्यार्थ्यांबराेबर मनमाेकळ्या गप्पा मारत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या छोटेखानी समारंभास शिक्षण समिती सदस्य, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!

गुणवंत विद्यार्थ्यांबराेबर साधला संवाद

शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, हानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसाेबत संवाद साधत दहावीचा अभ्यास कशा पध्दतीने केला? वेळेचे नियोजन कसे केले?, शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच यापुढे कोणत्या शाखेत प्रवेश घेणार आदी विषयांवर विद्यार्थ्यांबराेबर चर्चा करण्यात आली. यावेळी वि द्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली.

महापािलकेचा निकाल ९२.०८ टक्के इतका लागला

मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल ८ मे २०२६ रोजी जाहीर झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून एकूण १५,९०३ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महानगरपालिकेच्या शाळांचा सरासरी निकाल ९२.०८ टक्के इतका लागला आहे. एकूण ७७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. जी दक्षिण विभागातील सीताराम मिल कंपाऊंड माध्यमिक शाळेतील स्वयं शेखर गोरेगावकर या विद्यार्थ्यांने ९७.६० टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. के पश्चिम विभागातील डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील अशिया जाकीर सय्यद या विद्यार्थिनीने ९६.२० टक्के गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच प्रभादेवी मुंबई पब्लिक स्कूलमधील दीपक अरुण तिवारी आणि गोखले रोड मुंबई पब्लिक स्कूलमधील जिनल हरेश सुमेसरा या दोघांनी ९५.८० टक्के गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक पटकावला आहे. हे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी

Web Title: Palika vidyarthyanchi uttung bharari bmc successful students felicitation ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • BMC
  • School
  • Students

संबंधित बातम्या

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त
1

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

CBSE Language Policy : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! CBSE ने भाषा धोरणात केला मोठा बदल, दोन विदेशी भाषा शिकण्याची संधी
2

CBSE Language Policy : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! CBSE ने भाषा धोरणात केला मोठा बदल, दोन विदेशी भाषा शिकण्याची संधी

महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप
3

महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

Mumbai Rain News : उघड्या मॅनहोलचे वास्तव महापौरांसमोरच उघड! पाहणीदरम्यान एकजण गटारात पडला, माटुंग्यातील धक्कादायक प्रकार
4

Mumbai Rain News : उघड्या मॅनहोलचे वास्तव महापौरांसमोरच उघड! पाहणीदरम्यान एकजण गटारात पडला, माटुंग्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.