आज दिवाळी निमित्त पंढरपुरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विशेष सजावट करण्यात आली आहे.
दिवाळीचं औचित्त्य साधुन विठ्ठल रुख्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
दिवाळी निमित्त सकाळपासुन भक्ताची दर्शनासाठी मंदिरात गर्दी पाहायला मिळत आहे.
मंदिरातील नामदेव महाद्वारावर नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीचा चांदणीचा आकाशदिवा लावण्यात आला आहे