फोटो सौजन्य - Social Media
एडटेक कंपनी फिजिक्सवाला (PhysicsWallah) ने मार्केटिंग असोसिएट पदासाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी कंपनीला असा उमेदवार हवा आहे जो एबव्ह द लाईन (ATL) आणि बिलो द लाईन (BTL) मार्केटिंग कॅम्पेनचे प्रभावी नियोजन करून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करू शकेल. या भरतीचा उद्देश म्हणजे ब्रँडची ओळख वाढवणे आणि ऑफलाइन मार्केटिंग उपक्रमांच्या माध्यमातून क्वालिटी लीड्स तयार करणे. या पदावर निवड झालेल्या उमेदवाराची जबाबदारी ब्रँडची प्रतिमा बळकट करणे, इव्हेंट्स आणि प्रमोशनल अॅक्टिव्हिटीजचे नियोजन करणे, तसेच स्थानिक आणि प्रादेशिक मार्केटिंग उपक्रम जसे की प्रिंट मीडिया, आउटडोअर जाहिराती (OOH) आणि कम्युनिटी प्रोग्राम्सचे व्यवस्थापन करणे अशी असेल.
उमेदवाराने डिझाईन, कंटेंट आणि ऑपरेशन टीमसोबत समन्वय ठेवत बाह्य एजन्सी आणि वेंडर्ससोबत काम करून सर्व उपक्रम वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ब्रँडच्या सेंटरवर लोकांची उपस्थिती आणि एंगेजमेंट वाढवण्यासाठी विविध इव्हेंट्स, प्रमोशन्स आणि अॅक्टिव्हेशन प्रोग्राम्स आयोजित करावे लागतील. कॅम्पेनचे परिणाम ट्रॅक करणे, मार्केट रिसर्च करून नव्या ट्रेंड्सचा अभ्यास करणे आणि ब्रोशर, बॅनर, डिजिटल जाहिरातींसाठी सर्जनशील कल्पना देणे हीसुद्धा या भूमिकेचा भाग असेल.
या पदासाठी उमेदवार ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असावा. फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही प्रकारचे उमेदवार अर्ज करू शकतात. आवश्यक कौशल्यांमध्ये ऑफलाइन मार्केटिंग, ATL/BTL कॅम्पेन आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे ज्ञान, तसेच वेंडर कोऑर्डिनेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटची क्षमता असावी. क्रिएटिव्ह थिंकिंगसोबत डेटावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता आणि उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक आहेत.
वेतनाबाबत बोलायचे झाल्यास, Ambition Box या वेबसाइटनुसार Physics Wallah मध्ये मार्केटिंग असोसिएट पदाचे वार्षिक वेतन सुमारे ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख इतके असू शकते. या पदाचे कामकाज ठिकाण एडटेक कंपनी Physics Wallah ने मार्केटिंग असोसिएट (वेतन: ₹2.6 लाख ते ₹4.8 लाख वार्षिक) पदासाठी भरती जाहीर केली आहे, ज्यासाठी ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात.मेरठ, उत्तर प्रदेश येथे आहे. इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील “Apply Now” लिंकद्वारे अर्ज करू शकतात. Physics Wallah Pvt. Ltd. ही भारतातील आघाडीची एडटेक कंपनी असून, तिची स्थापना अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांनी 2020 मध्ये केली होती. नोएडामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी 2022 मध्ये $1.1 अब्ज व्हॅल्युएशनसह भारतातील यूनिकॉर्न कंपन्यांपैकी एक ठरली.