आता तुमचा प्रत्येक फोटो असणार परफेक्ट! फोटोग्राफीसाठी हे आहेत बेस्ट स्मार्टफोन, आजच करा खरेदी
तुम्हाला यावर्षी एक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल, असा एक स्मार्टफोन जो परफेक्ट फोटोसाठी बेस्ट कॅमेरा ऑफर करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही देखील अशा एखाद्या स्मार्टफोनच्या शोधात आहात का जो फोटो क्लिक करताना DSLR ला देखील मागे टाकेल. तुम्हाला देखील फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीची आवड आहे का? तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करताना स्मार्टफोनच्या इतर फीचर्सपेक्षा कॅमेऱ्याला सर्वात जास्त महत्त्व देता का? आता आम्ही तुम्हाला अशाच पाच स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, ज्याचा कॅमेरा DSLR ला देखील मागे टाकेल.
मोबाईल फोटोग्राफीची आवड असणाऱ्या लोकांसाठी Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक फोटोला चांगले डिटेल आणि कलर मिळतात. यासोबतच यामध्ये 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल लेंस आणि 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस देखील देण्यात आले आहे. ज्यामुळे 3x आणि 5x झूम सारखी सर्विस मिळते. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
Apple चा हा आयफोन त्याच्या कॅमेऱ्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. या आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये प्राइमरी, अल्ट्रा-वाइड आणि पेरिस्कोप टेलीफोटो तिन्ही लेंस 48 मेगापिक्सेल सेंसरसह येतात. ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह हा फोन क्लियर फोटो कॅप्चर करतो. या फोनचा 18 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील कमाल आहे.
Google Pixel 10 Pro त्याच्या एडवांस्ड AI कॅमेरा फीचर्ससाठी ओळखला जातो. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर आणि 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस देण्यात आला आहे. Google ची इमेज प्रोसेसिंग टेक्नोलॉजी फोटोला रियल आणि बैलेंस्ड लूक देते. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 42 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
iPhone 16 Pro हा आयफोन कॅमेरा क्वालिटी आणि परफॉर्मेंसचे परफेक्ट मिश्रण आहे. यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्राइमरी लेंस, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह क्लिक करण्यात आलेले फोटो अतिशय स्मूद आणि साफ असतात. यामध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
ज्यांना हाय-एंड कॅमेरा फीचर्स पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट असणार आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा आहे.