भाजप मधून शिवसेनेत आनंद भरोसे यांनी प्रवेश केल्या नंतर त्यांना परभणी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. तेव्हापासून जुन्या शिवसैनिकांची नाराजी पसरली होती. अशातच महानगर पालिका निवडणुकीत जुन्या शिवसैनिकांना विश्वासात न घेऊन तिकीट वाटप केले जात असल्याने त्यांनी अल्पसंख्य विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. यावेळी कोणीही पक्ष सोडून जाऊ नका तुमची नाराजी मी उपमुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचवतो अशी ग्वाही निरीक्षक म्हणून आलेल्या सईद खान यांनी शिवसैनिकांना दिली आहे. त्यामुळे परभणीतील अंतर्गत वाद आता थेट उपमुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांच्या पर्यंत जाणार असल्याने ते यावर काय तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.