Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Loan: उच्च शिक्षणासाठी आता पैशांची अडचण नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळते विना-तारण कर्ज

PM Vidyalaxmi Scheme Education Loan : केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना' अंतर्गत विद्यार्थ्यांना विना-हमी आणि विना-तारण किती रुपयांपर्यंतचे एज्युकेशन लोन मिळते आणि यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 06, 2026 | 01:55 PM
education loan

education loan

Follow Us
Follow Us:

PM Vidyalaxmi Scheme Education Loan: जर आर्थिक अडचणींमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होत असेल, तर केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना’ त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना कोणतीही हमी न देता आणि कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता एज्युकेशन लोन दिले जाते. एवढेच नाही तर, सरकार कर्जावर व्याजात सूट आणि बँकांना क्रेडिट हमी यांसारख्या सुविधा देखील देते, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेणे सोपे होते.

ही योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांनुसार सुरू करण्यात आली आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की, आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गुणवान विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणात अडथळा येऊ नये. या योजनेअंतर्गत संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल ठेवण्यात आली असून विद्यार्थी एकाच पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकतात.

पीएम विद्यालक्ष्मी योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही केंद्र सरकारची एक शैक्षणिक कर्ज (Education Loan) योजना आहे. याद्वारे देशातील मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विना-हमी आणि विना-तारण एज्युकेशन लोन उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा उद्देश अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे आहे, ज्यांना पात्रतेच्या आधारावर कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश तर मिळतो, परंतु फी आणि इतर खर्च उचलणे कठीण होते.

विना-हमी आणि विना-तारण मिळणार लोन

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना कर्ज घेण्यासाठी कोणत्याही हमीची गरज भासत नाही आणि बँकांकडे कोणतीही जमीन, घर किंवा इतर मालमत्ता गहाण ठेवावी लागत नाही. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर होतो.

या योजनेअंतर्गत ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या एज्युकेशन लोनवर केंद्र सरकार ७५ टक्क्यांपर्यंतची क्रेडिट हमी (क्रेडिट गव्हरंटी) देते. याचा अर्थ असा की, जर एखाद्या कारणामुळे विद्यार्थी कर्ज परतफेड करण्यास असमर्थ ठरला, तर सरकार निर्धारित नियमांनुसार बँकेच्या जोखमीचा मोठा भाग उचलते. यामुळे बँकांसाठी विना-हमी कर्ज देणे सोपे होते.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार व्याजात सूट?

  • या योजनेअंतर्गत कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर व्याज सबसिडीचा लाभ देखील दिला जातो.
  • ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या एज्युकेशन लोनवर ३ टक्के व्याज सबसिडी मिळेल.
  • तसेच, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना निर्धारित अटींनुसार संपूर्ण व्याज सबसिडीचा लाभ दिला जाईल.
  • सरकारचे उद्दिष्ट दरवर्षी मोठ्या संख्येने पात्र विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्याचे आहे.
Google top employer: भारतात ‘ही’ कंपनी ठरली सर्वात आकर्षक नियोक्ता; टाटा आणि ॲमेझॉनला कोणते स्थान मिळाले? जाणून घ्या..

कोणकोणते विद्यार्थी घेऊ शकतात या योजनेचा लाभ?

या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळेल, ज्यांना नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत निवडलेल्या गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला आहे. याशिवाय, देशातील टॉप NIRF रँक असलेल्या संस्था, १०१-२०२ रँक असलेल्या राज्य सरकारी संस्था आणि केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये शिकणारे पात्र विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

विशेष म्हणजे, एज्युकेशन लोन घेण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही, परंतु व्याज सबसिडीचा लाभ केवळ ठराविक उत्पन्न मर्यादा असलेल्या कुटुंबांनाच मिळेल.

Business Management: NMIMS एमबीए प्रवेश प्रक्रिया कधीपासून होणार सुरू? जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत आणि कॅम्पसची सविस्तर माहिती!

पीएम विद्यालक्ष्मी लोनसाठी अर्ज कसा करावा?

1. सर्वात आधी अधिकृत पीएम विद्यालक्ष्मी पोर्टलवर जा.

2. त्यानंतर पोर्टलवर ‘न्यू रजिस्ट्रेशन’ वर क्लिक करून नोंदणी करा.

3. आता ‘कॉमन एज्युकेशन लोन अप्लिकेशन फॉर्म’ भरा.

4. यानंतर आपल्या पसंतीची बँक निवडून अर्ज जमा करा.

5. आता बँक अर्जाची पडताळणी करेल आणि संपूर्ण प्रक्रियेची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल.

याशिवाय, विद्यार्थी अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक देखील करू शकतात.

Web Title: Pm vidyalaxmi scheme education loan features marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • education
  • Government
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर
1

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर

UK Graduate Visa: परदेशात शिकणाऱ्या भारतीयांचे टेन्शन संपले! ब्रिटिश सरकारने ग्रॅज्युएट व्हिसाबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा
2

UK Graduate Visa: परदेशात शिकणाऱ्या भारतीयांचे टेन्शन संपले! ब्रिटिश सरकारने ग्रॅज्युएट व्हिसाबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू
3

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू

QS World University Rankings 2027: भारतातील विद्यापीठांचा आशियात डंका; जाणून घ्या देशातील टॉप १० संस्थांची यादी
4

QS World University Rankings 2027: भारतातील विद्यापीठांचा आशियात डंका; जाणून घ्या देशातील टॉप १० संस्थांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.