फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Police And Armed forces Uniform Rules: तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, एखाद्या लग्नात नवरदेव किंवा पाहुण्यामध्ये एखादा पोलीस अधिकारी किंवा सैन्याचा जवान आपल्या वर्दीमध्ये दिसला तर कार्यक्रमातील सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. वर्दी म्हणजे केवळ कपडे नसून ती देशसेवा, शिस्त आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होते की, पोलीस सैनिक किंवा इतर वर्दीधारी कर्मचारी लग्नाकार्यासारख्या खाजगी समारंभांमध्ये त्यांची युनिफॉर्म घालून सहभागी होऊ शकतात का? चला तर मग जाणून घेऊया..
भारतीय सैन्यात काही विशेष प्रसंगी अधिकृत वर्दी घालण्याची परवानगी असते. जर एखाद्या सैनिकाचे किंवा अधिकाऱ्याचे स्वत:चे लग्न असेल तर औपचारिकरित्या हा ड्रेस म्हणून युनिफॉर्म घालू शकतो. मात्र, त्यासाठी सैन्याच्या प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असते. तसेच त्यांना प्रत्येक प्रसंगी वर्दी घालण्याची सूट नसते.
भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) लागू असलेले ‘इंडियन पोलीस सर्व्हिस (युनिफॉर्म) रूल्स, १९५४’ (Indian Police Service (Uniform) Rules, 1954) मुख्यत्वे वर्दीची रचना, वापर, देखभाल आणि त्याशी संबंधित भत्त्यावर नियंत्रण ठेवतात. या नियमांमध्ये वर्दी घालण्यासाठी निर्धारित ड्रेस कोड, युनिफॉर्म ग्रांट, किट मेटेनन्स, अलाउन्स आणि ड्युटीदरम्यान वर्दीच्या वापराची तरतूद निर्धारित आहे.
तसेच या नियमामध्ये एखादा पोलिस अधिकारी खाजगी कार्यक्रमात किंवा लग्नात वर्दी घालून जाऊ शकत नाही असे स्पष्ट लिहले नाही. सामान्यता पोलिस आणि सशस्त्र दलांमध्ये वर्दी घालून एखाद्या समारंभाला जाण्यासाठी विभागीय प्रोटोकॉल, सेवा नियम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश लागू होतात. जर कार्यक्रम अधिकृत, औपचारिक किंवा विशेष असल्यास वर्दी घालता येते. परंतु, खाजगी आयोजनांमध्ये वर्दीच्या वापराबाबत संबंधित मार्गदर्शक तत्वे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
वर्दी ही केवळ वैयक्तिक ओळख नसून ती सरकारी अधिकार आणि जबाबदारीचे प्रतिक असते. म्हणूनच तिचा आदर आणि सन्मान राखला जावा. यासाठी तिच्या मर्यादा निर्धारित करण्यात आल्या आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास, लग्नात वर्दी घालणे पूर्णपणे शक्य असून ते संबंधित नियमांवर आणि परवानगीवर अवलंबून असते.






