Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Wai News: 'दक्षिण काशी' वाईत कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा! वाहतुकीचे उल्लंघन, बुलेटचे कर्णकर्कश आवाज अन् गुटखा विक्रीने नागरिक हैराण; पोलिसांच्या कडक कारवाईची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 11, 2026 | 06:26 PM
Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? (Photo Credit- AI)

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही?
  • बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
  • वाचा सविस्तर बातमी!
वाई: ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून, पोलिसांच्या कारवाईचा धाक नेमका कुठे आहे, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील काही भागांत नियमबाह्य वाहनचालकपणाचे प्रकार, अल्पवयीनांकडून दुचाकींचा वापर, ट्रिपल सीट प्रवास, मॉडिफाइड सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज तसेच पानटपऱ्यांवर गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. याचबरोबर चोरीच्या घटनांबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शहरातील रस्त्यांवर काही युवकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांकडे दुचाकी असणे, ट्रिपल सीट प्रवास करणे आणि भरधाव वेगाने वाहने चालविणे यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधूनमधून कारवाई होत असली तरी ती सातत्याने आणि प्रभावीपणे होण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.

बुलेटच्या ‘फटाक्यां’नी रात्रीची शांतता भंग

मॉडिफाइड सायलेन्सर बसविलेल्या काही बुलेटमधून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढत शहरातून फिरण्याचा प्रकार नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक होणाऱ्या या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना त्रास होत असल्याचे सांगितले जाते. वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक विभागाने कठोर कारवाई करावी, तसेच नियमबाह्य सायलेन्सर काढून घेऊन संबंधित वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गुटखा विक्रीवर नियंत्रण कोणाचे?

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध असतानाही शहरातील काही पानटपऱ्यांवर अशा पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका लक्षात घेता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त होत आहे. गुटखा नेमका कुठून येतो, त्याचा पुरवठा कोण करतो आणि शहरातील कोणत्या ठिकाणी त्याची विक्री होते, याचा शोध घेण्यासाठी पोलीस तसेच संबंधित अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Wai News: धान्य गोदामामागील रस्ता चिखलात; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये धाकधूक

शहरात चोरीच्या घटनांबाबतही नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. एखाद्या घटनेनंतर तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरते; मात्र सीसीटीव्ही उपलब्ध नसलेल्या भागांमध्ये तपासाची दिशा थांबता कामा नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. स्थानिक माहितीचे जाळे, तांत्रिक तपास, संशयितांची चौकशी, चोरीच्या मालाची विक्री कुठे झाली याचा मागोवा आणि पूर्वीच्या गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती या माध्यमातूनही तपासाला दिशा देता येऊ शकते. त्यामुळे तपास यंत्रणेने पारंपरिक तपास पद्धतींसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे.

‘कारवाई दिसली पाहिजे’, नागरिकांची अपेक्षा

वाई शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे युवक, अल्पवयीनांकडून वाहनचालकपणाचे प्रकार, मॉडिफाइड सायलेन्सरचा त्रास, गुटखा विक्री आणि चोरीच्या घटनांबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे केवळ कारवाईच्या घोषणा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर नियमित तपासणी आणि दोषींवर ठोस कारवाई दिसणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “पोलीस यंत्रणा आहे; मात्र तिचा धाक जाणवला पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाली, तरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल,” अशी अपेक्षा वाईकरांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या सर्व तक्रारींची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शहरात विशेष मोहीम राबवावी आणि कायदा-सुव्यवस्थेचा धाक पुन्हा निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Web Title: Wai crime law and order traffic rules violation police action marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • police
  • Satara
  • Satara News
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
1

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
2

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
3

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या
4

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.