Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News: बाह्य संस्थेमार्फत शिक्षक देण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर, कोपरखैरणेतील CBSE ला मिळणार शिक्षक

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर संपणार आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील शाळेला अखेर शिक्षक मिळणार आहेत. काय आहे नक्की प्रकरण याबाबत अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 18, 2026 | 11:48 AM
अखेर कोपरखैरणेत CBSE शाळेला मिळणार शिक्षक (फोटो सौजन्य - iStock)

अखेर कोपरखैरणेत CBSE शाळेला मिळणार शिक्षक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • कोपरखैरणे येथील शाळेला अखेर मिळणार शिक्षक 
  • सीबीएसई शाळेत येणार शिक्षक 
  • वादंगानंतर आता अखेर प्रकरणावर पडदा 
नवी मुंबई/सिद्धेश प्रधानः नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे येथील पीएम श्री नवी मुंबई महानगरपालिका – सीबीएसई शाळा क्रमांक ९४ येथे शालेय शिक्षक देण्यासाठी ‘नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ’ या संस्थेची नियुक्ती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. बाह्य संस्थेमार्फत शिक्षक पुरवठा करारावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादंगानंतर अखेर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

शिक्षण व्हिजन धोरणानुसार नवी मुंबईमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कोपरखैरणे, नेरूळ सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कोपरखैरणेतील महापालिकेच्या शाळा क्रमांक ९४ साठी शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळासोबत करार करण्याच्या प्रस्तावावरून स्थायी समितीत वादंग निर्माण झाला होता. मात्र, चर्चेअंती या प्रस्तावाला सुधारणेसह मंजुरी देत सुमारे ३४ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपयांचा १० वर्षांच्या करार पद्धतीने शिक्षक देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

स्व-मूल्यमापनासाठी शाळांना देण्यात आली मुदतवाढ; SQAAF अंतर्गत स्व-मूल्यमापन करणे बंधनकारक

“या ठरावाबाबत इत्यंभूत माहिती या ठरवाबाबत इत्यंभूत माहिती निर्माण होत आहे. सचिवांनी ठराव परिपूर्ण द्यावा. या शाळेत किती शिक्षक घेतले जाणार? दहा वर्षांचा करार का केला आहे? पालिकेने प्रत्येक वर्षी करार करावा” – मंदाकिनी म्हात्रे नगरसेविका, गोठीवली गाव शिवसेना
“हा विषय केवळ खर्च मंजूरीचा नसून महापालिकेच्या शैक्षणिक धोरणाचा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, शिक्षक व्यवस्थापनाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आहे. त्यामुळे अशा प्रस्तावाकडे केवळ कंत्राट, निविदा किंवा खर्चाच्या चौकटीतून पाहू नये. जवळपास ३५ कोटी कोणत्या आधारावर ठरविण्यात आले आहेत. सुरुवातीच्या अंदाजपत्रकातच भविष्य निर्वाह निधीचा समावेश का करण्यात आला नव्हता? या दीर्घकालीन करारा ऐवजी किमान २ किवा ३ वर्षांचा प्रायोगिक कालावधी ठेवणे गरजेचे होते. पालिकेने स्वतःच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देणे गरजेचे होते” – सरोज पाटील नगरसेविका, शिवसेना, अग्रोळी गाव “आपण हा विषय आणला तो सर्व विचार करूनच राहणे गरजेचे आहे. शिक्षक टिकणे महत्वाचे आहे. म्हणून दहा वर्षांचा करार संस्थेशी केला आहे. तसेच पालिकेचा प्रशासकीय अधिकारी त्यांच्या कार्यालयात राहणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत” – अशोक पाटील, सभापती, स्थायी समिती, नवी मुंबई पालिका “कोपरखैरणेची शाळा आकांक्षा फाउंडेशनला दिली होती. त्यावेळी तत्कालीन स्थायी समितीने सिवुडची शाळा पालिकेने स्वतः चालवावी अशा सूचना दिल्या होत्या मात्र पालिकेने दिलेल्या शिक्षकांबद्दल पालिकांना तक्रारी होत्या. सीबीएसईचा दर्जा चांगला राखण्यासाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची भरती संस्थेद्वारे केली जात आहे” – संघरत्ना खिल्लारे, शिक्षण उपआयुक्त, नवी मुंबई पालिका “नवी मुंबई पालिका शिक्षण विभाग स्वागतार्ह पाऊल टाकत आहे. सीबीएसई शाळांचा दर्जा टिकवणे गरजेचे असून, त्यानुसार शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या बाबतीत पालकांची तक्रार येता कामा नये” – सुधाकर सोनवणे, स्थायी समिती सदस्य “सारसोळे येथे शाळा सुरू केली आहे. आमचा लोकप्रतिनिधी तिथे बाहेर बसला होता. त्या शाळेचा विचार व्हायला हवा. तिथे शिक्षक उपलब्ध व्हायला हवेत. मराठी माध्यमाच्या शाळांची सीबीएसई प्रमाणे काळजी घ्यावी. ताडचेह शिक्षण विभागाने यापुढे परिपूर्ण प्रस्ताव आणावा, चालढकल पण करू नये प्रशासकीय अधिकारी नेमताना शिपायाचा क्लार्क झालेला अॅडमिनिस्ट्रेटर बसवू नका” – जयवंत सुतार, माजी महापौर, स्थायी समिती सदस्य

नवी मुंबई महापालिकेच्या CBSE शाळेत शिक्षक भरतीचा ‘पेच’; महिला मंडळाला कंत्राट देण्यावरून रणकंदन, विजय चौगुले आक्रमक

Web Title: Proposal to appoint teachers through external agency finally approved koparkhairane cbse school to receive teachers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • CBSE
  • education news
  • Marathi Batmya

संबंधित बातम्या

पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान
1

पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
2

Education News: राज्यात वैद्यकीय MBBS-BDMS च्या दुसऱ्या यादीत10,938 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
3

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

CBSE Three Language Policy: सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; इंग्रजीच्या स्थितीवरही उपस्थित झाला प्रश्न
4

CBSE Three Language Policy: सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; इंग्रजीच्या स्थितीवरही उपस्थित झाला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.