पुण्यातील नामवंत कॉलेजमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल यासह 24 पदांवर भरती; ‘इथे’ करा अर्ज!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या पुणे येथील सूर्यदत्ता लॉ कॉलेजमध्ये विविध २४ पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत असणार आहे.
संस्थेचे नाव : सूर्यदत्ता लॉ कॉलेज, बावधन, पुणे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत)
रिक्त असलेली पदे : प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक
रिक्त पद संख्या : 24 पदे
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) – E-Mail ID – career@suryadatta.edu.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक एचआर, एसईएफ, सर्व्हे नंबर ३४२, बावधन, पुणे ४११०२१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्यात आत
(फोटो सौजन्य : istock)
भरतीचा तपशील
या भरतीमध्ये प्रामुख्याने प्राचार्य- १ जागा, सहायक प्राध्यापक (कायदा विषयासाठी रिक्त जागा – १०), सहायक प्राध्यापक (इंग्लिश विषयासाठी रिक्त जागा – १०), सहायक प्राध्यापक BA LLB (इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि सोशिओलॉजी विषयासाठी रिक्त जागा – ३), ग्रंथपाल – २ जागा, मूट कोर्ट समन्वयक – १ जागा, शारीरिक संचालक – १ जागा आणि संगणक प्रशिक्षक – १ जागा.
कसा कराल अर्ज?
संस्थेच्या वरील पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्यात आत. उशीरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/1hvMWhpqJTCtLoraoTD_gsJgBeTPdtNy_/view
अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in