Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

सीईटी परीक्षा राज्यातील २ लाख ६१ हजार २२२ तर राज्याबाहेरील १९९१ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १८६ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 21, 2026 | 02:35 AM
Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
Follow Us
Follow Us:
  • पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
  • पीसीबी समूहाच्या सीईटी परिक्षेत ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण
  • सर्व ११ विद्यार्थी राज्यातील, यातील ३ विद्यार्थिनी तर ८ विद्यार्थी
सोनाजी गाढवे /पुणे:महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश (Career) परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या पीसीबी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या या सीईटी परीक्षेमध्ये ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यातील ८ विद्यार्थी असून ३ विद्यार्थिनी आहेत तर यातील सर्व ११ विद्यार्थी राज्यातील असून एकही विद्यार्थी महाराष्ट्र बाहेरील राज्यातील नाही. सदरचा निकाल विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक २१ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ रोजी सहा दिवसामध्ये ११ सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत ११ सत्रात मिळून २ लाख ६३ हजार २१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १ लाख ३ हजार ३६० विद्यार्थी होते व १ लाख ५९ हजार ८४८ विद्यार्थिनी होत्या तर ५ तृतीयपंथीय होते. यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे. याला ९२.६६% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

MHT CET Admission 2026: कृषी अभ्यासक्रम प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; ऑनलाईन अर्जासाठी ‘ही’ आहे नवीन अंतिम तारीख!

सीईटी परीक्षा राज्यातील २ लाख ६१ हजार २२२ तर राज्याबाहेरील १९९१ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १८६ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.

१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे ११ विद्यार्थी पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण ११ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील नागपूर येथील आदित्य अभिषेक सोमाणी, पालघर येथील कुमारी झील हितेश छेडा, मुंबई शहर येथील ॲशले कोस्टॅनसीओ फर्नांडिस,कोल्हापूर येथील अथर्व उत्तम गडदे, सोलापूर येथील कुमारी प्रतीक्षा दीपक गाढवे, धुळे येथील अथर्व अविनाश काकुळडे, सांगली येथील सार्थक महेश पाटील, कोल्हापूर येथील साहिम सादिक पटवेगर, पुणे येथील कुमारी राशी अमितकुमार चोप्रा, ठाणे येथील सौरीश सेन व पुणे येथील वरद अवधूत वैद्य या राज्यातील ११ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यामध्ये ३ विद्यार्थिनी आहेत. या निकालामध्ये यावेळेस राज्याबाहेरील एकही विद्यार्थी १०० टक्के पर्सेंटाइल मिळविणारा नाही.

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!

प्रवर्गनिहाय सर्वोच्च पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी
खुला प्रवर्ग पर्सेंटाईल
-आदित्य अभिषेक सोमाणी, नागपूर – १००
-कुमारी झील हितेश छेडा, पालघर – १००
-ॲशले कोस्टॅनसीओ फर्नांडिस, मुंबई शहर -१००
-सार्थक महेश पाटील, सांगली- १००
-कुमारी राशी अमितकुमार चोप्रा,पुणे- १००
-सौरीश सेन, ठाणे – १००
-वरद अवधूत वैद्य, पुणे -१००
एससी प्रवर्ग (SC)
-वैदेही विजय कांबळे, कोल्हापूर- ९९.९९
एसटी प्रवर्ग (ST)
-भावेश सुरेश चव्हाण, रत्नागिरी- ९९.९८
ओबीसी प्रवर्ग (OBC)
-कुमारी प्रतीक्षा दीपक गाढवे, सोलापूर १००
– अथर्व अविनाश काकुळडे,धुळे १००
– साहिम सादिक पटवेगर,कोल्हापूर १००
एसबीसी प्रवर्ग (SBC)
– पुनम तेजस नेमाने, कोल्हापूर- ९९.९९
एसइबीसी प्रवर्ग (SEBC)
– समीर अभय जाधव, कोल्हापूर – ९९.९९
डीटी/ व्हिजे प्रवर्ग (DT/VJ)
– गिरीश मंगलसिंग गोठवाल, जळगाव – ९९.९७
एनटी १ बी प्रवर्ग (NT1 B)
-प्रसाद रमेश पुरी, नांदेड – ९९.९८
एनटी २ सी प्रवर्ग (NT2 C)
– अथर्व उत्तम गडदे, कोल्हापूर- १००
एनटी ३ डी प्रवर्ग (NT3 D)
-विश्वजीत महादेव लाटे, सांगली- ९९.९४

Web Title: Results of the pcb groups cet entrance exam for the first attempt have been declared career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Career News
  • CET
  • pune news

संबंधित बातम्या

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
1

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
2

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
3

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
4

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.