Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यातील पालिका अभ्यासिकेचा ठसा! MPSC मध्ये विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

सातारा पालिकेच्या गोडोली येथील अभ्यासिकेतील ४ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. विवेक चव्हाण, राकेश जाधव, आदिती शिंदे आणि सुरज भोसले यांची विविध पदांवर निवड झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 15, 2026 | 07:30 PM
सातारा : पालिका अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर व मान्यवर

सातारा : पालिका अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर व मान्यवर

Follow Us
Follow Us:

 

  • सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा!
  • पालिकेच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेत गाजवलं यश
सातारा पालिकेच्या गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (दादा महाराज) स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. सातत्यपूर्ण मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासिकेतील शैक्षणिक वातावरणाच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

या अभ्यासिकेतून तयारी करून विविध शासकीय पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विवेक चव्हाण (ठाणे शहर पोलीस), राकेश जाधव (कर सहाय्यक व महसूल सहाय्यक), आदिती शिंदे (महसूल सहाय्यक) आणि सुरज भोसले (पुणे शहर पोलीस) यांचा समावेश आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी आणि साधने मिळाल्यास ते मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवू शकतात, असे मत व्यक्त केले. तसेच भविष्यात ही अभ्यासिका अधिक अद्ययावत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी! वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगताना अभ्यासिकेतील पोषक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. भविष्यात प्रशासकीय सेवेत कार्य करताना सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या प्रसंगी श्रद्धा नांदुगडे, सुमित बनकर, प्रतीक्षा गुरव, प्रांजली माने, वैभव साळुंखे यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल खासदार उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

CBSE 10th Result : 10वी निकाल 2026 जाहीर; 33% गुणांची अट, असा करा ऑनलाइन निकाल चेक

Web Title: Satara municipal study center mpsc success students felicitation 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Career News
  • MPSC
  • Satara News

संबंधित बातम्या

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी
1

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
2

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या
3

Judicial Services Exam : न्याय सेवा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत बदल; वकिलीचा अनुभव ३ वरून किती वर्ष केला? जाणून घ्या

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
4

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.