राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? (Photo Credit- X)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, “माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत. मी स्पष्ट करू इच्छितो की, या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही.” प्रफुल्ल पटेल यांच्या या खुलाशामुळे पक्षांतर्गत सुरू असलेल्या अध्यक्षपदाच्या रेसवर तात्पुरता पडदा पडला आहे.
I have noted few reports circulating in the media regarding my appointment as the National President of the Nationalist Congress Party. I wish to state with absolute clarity that these reports are totally baseless and lack any truth. The Nationalist Congress Party is a… — Praful Patel (@praful_patel) February 1, 2026
Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम
अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही घाईघाईने केलेली नियुक्ती म्हणजे पक्षावरील नियंत्रण राखण्याचा एक प्रयत्न आहे. पक्षात दोन गट पडले असून एका गटाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (सपा) विलीनीकरण नको आहे. संघटनेवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांना पुढे करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवार यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, त्यांनी “मला याबाबत काहीही माहिती नाही,” असे म्हणत मौन पाळले. पवारांच्या या भूमिकेमुळे काका-पुतण्यांच्या पक्षातील संबंध भविष्यात काय वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली की, अजित पवारांचा अस्थिकलश मुंबईत आणला असून तो प्रत्येक जिल्ह्यात नेला जाईल. विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले, “हा कुटुंबाचा निर्णय आहे आणि पवार कुटुंब जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.”






