पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील पंचसूत्री नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीचा आढावा, एनआयआरएफ, एसआयआरएफ, महासार्क, महाद्वार, पीएम उषाच्या धर्तीवर सीएम उषा यांसह उच्च्च व तंत्रशिक्षण विभागासोरील आव्हाने आणि उपाययोजना याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर उच्चस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, इनफ्लबनेट गांधीनगरच्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी सीओईपीचे कुलगुरु प्रा. डॉ. सुनील भिरुड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांच्यासह विविध विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, मंत्रालयीन सहसचिव / उपसचिव, अवर सचिव, कक्षाधिकारी, विद्यापीठांचे कुलसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सर्व विभागीय सहसंचालक, विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कार्यशाळेचा उद्देश विकसित भारत आणि महाराष्ट्रसाठी विद्यापीठांची भूमिका आणि योगदान अधोरेखित करून देणे हा होता. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गेल्या वर्षात विकसित केलेल्या महत्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून विद्यापीठांच्या पुढील वाटचालीची दिशा कशी असेल यावर चर्चा झाली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वेणुगोपाल रेड्डी यांनी पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील पंचसूत्रीबाबत उपस्थित सर्व विद्यापीठांचे कुलगुरु आणि प्राध्यापक यांना माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ह्यूमन कॅपिटल डेव्हलपमेंट आणि उच्च शिक्षणाचे ज्ञान आधारित अर्थशास्त्रा यावर मार्गदर्शन केले. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याबाबत विस्तृत विवेचन मांडले. तर नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमधील काही आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. इंडस्ट्री आणि विद्यापीठांची फुटप्रिंट वाढवणं आवश्यक असल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ पराग काळकर यांनी केले, तर मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इनफ्लबनेट केंद्र, गांधीनगर यांच्यात सामजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी झाला.






