Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवा महाविद्यालयात सौर ऊर्जा जनजागृती उपक्रम संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विवा महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सौर ऊर्जा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 24, 2025 | 02:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ चे आयोजन विवा महाविद्यालय, विरार येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या दोन दिवसीय उपक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे.

सरकारी नोकरी: सरकारी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4500 पदांवर भरती; शेवटची तारिक आज…

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे, प्राचार्य डॉ. एस. एस. खरात (मॉडर्न कॉलेज, पुणे), विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात ‘सौर ऊर्जा पर्यावरण रक्षण आणि उर्जासुरक्षेसाठीचा प्रभावी उपाय’ या विषयावर माहितीपट दाखवण्यात आला. हा माहितीपट करिअर कट्टा अ‍ॅपवरून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यावर आधारित प्रश्नोत्तरी देखील आयोजित करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या अभियानात एकूण ५५,५५५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्याचे उद्दिष्ट आहे. विवा महाविद्यालयातील सहभागास मान्यता देत संस्था आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयीची जाण वाढण्यास हातभार लागणार आहे.

सरकारी नोकरी: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2964 पदांसाठी भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू, 29 जूनपर्यंत अर्ज करा

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्रजी ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर तसेच समिती सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक नारायण कुट्टी आणि करिअर संसदेचे विद्यार्थी, करिअर कट्टा समिती सदस्य व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Solar energy awareness campaign completed at viva college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • palghar
  • Solar Project
  • virar

संबंधित बातम्या

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा
1

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar Crime : पत्नीने घर सोडण्याची भाषा करताच पती-नणंदेचा संताप, धारधार शस्त्राने विवाहितेची निर्घृण हत्या
2

Virar Crime : पत्नीने घर सोडण्याची भाषा करताच पती-नणंदेचा संताप, धारधार शस्त्राने विवाहितेची निर्घृण हत्या

Palghar News: खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून लघु उद्योजकाची आत्महत्या, गुन्हा दाखल
3

Palghar News: खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून लघु उद्योजकाची आत्महत्या, गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.