Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

Farmers Crop Loan Issue : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील आदिवासी सेवा सोसायटी प्रशासनाकडून खातेदारांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पीक कर्जमाफीनंतर नवीन कर्जाच्या नावाखाली कागदपत्रांवर सह्या घेऊनही ऐन हंगामात कर्ज न दिल्याने आदिवासी शेतकऱ्यांवर नामुष्की ओढवली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 04, 2026 | 11:42 AM
खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त ( सौजन्य - सोशल मीडिया )

खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आदिवासी सेवा सोसायटीकडून खातेदारांची फसवणूक ?
  • कर्ज वाटप न झाल्याने शेतकरी संकटात
  • प्रशासनाकडे कारवाईची मागणी
Farmers Crop Loan Issue : आदिवासी सेवा सोसायटी, खोडाळा येथील आदिवासी खातेदारांनी सोसायटी प्रशासनाकडून फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीक कर्जमाफीनंतर नवीन कर्जवाटप करण्याचे आश्वासन देऊन स्वाक्षऱ्या घेतल्या, मात्र प्रत्यक्षात कर्ज न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मोखाडा तहसीलदार, पोलीस ठाणे आणि पालघर जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. ( Farmers Crop Loan Issue )

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

संबंधित आदिवासी खातेदारांचे यापूर्वीचे सोसायटी कर्ज शासनाकडून माफ झाले होते. त्यानंतर २०२४मध्ये पुढील शेतीकामांसाठी नवीन कर्जाची मागणी खातेदारांनी नोंदवली. त्यावेळी सोसायटी कार्यालयात खातेदारांकडून आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि ३० तारखेपर्यंत कर्जाचे वाटप केले जाईल, असा शब्द दिला. मात्र, आदिवासी सेवा सोसायटीचे सचिव विष्णू जोशी यांच्याकडून अद्याप कर्जवाटप झाले नसल्याचा आरोप खातेदारांनी अर्जात केला आहे. वारंवार कार्यालयात चकरा मारूनही कर्ज न मिळाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

आदिवासी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

ऐन हंगामात हक्काचे कर्ज न मिळाल्याने आदिवासी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिणामी, शेतीचा खर्च भागवण्यासाठी काही खातेदारांना घरातील दागिने सावकारांकडे गहाण ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आदिवासी शेतकऱ्यांना तत्काळ न्याय द्यावा आणि फसवणूक करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सावकारांकडे हात पसरण्याची वेळ

आडोशीचे शेतकरी प्रकाशा गांगुर्डे स्पष्टच म्हणाले की,  ‘शेतकऱ्यांनी विश्वासाने सोसायटीकडे मदतीची अपेक्षा केली होती; मात्र, वारंवार मागणी करूनही वाटप न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीचा हंगाम सुरू असताना त्यांना सावकारांकडे हात पसरण्याची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी’.

ही अतिशय गंभीर बाब

खोडाळाचे उपसरपंच उमेश येलमामे म्हणाले, ‘आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची सोसायटी मिळत नसेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. ऐन हंगामात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेदारांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई झालीच पाहिजे’.

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Web Title: Khodala adivasi seva society crop loan fraud mokhada farmers demand action ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Crisis on farmers
  • palghar

संबंधित बातम्या

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले
1

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा
2

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

Buldhana: खरीप  ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
3

Buldhana: खरीप ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
4

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.