Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News : सर्व शाळांची होणार पट-पडताळणी; ‘या’ कालावधीत केली जाणार तपासणी

परभणीमध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी तसेच इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी दिनांक ११ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2026 | 05:19 PM
Student enrollment verification in Parbhani District Council schools for 2 nd to 12th

Student enrollment verification in Parbhani District Council schools for 2 nd to 12th

Follow Us
Close
Follow Us:

Parbhani News : परभणी : जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी तसेच इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी दिनांक ११ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सविता बिरगे यांनी दिली आहे. (Educational News) सदर पट-पडताळणी करण्याबाबतच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या दिवशी म्हणजेच दिनांक ११ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्याबाबत देण्यात आल्या आहेत. (Parbhani News)

या पटपडताळणीच्या अनुषंगाने इयत्ता नववीच्या मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या वार्षिक परीक्षा अनुक्रमे दिनांक ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याच्या राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांची पटपडताळणी करण्याच्या अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन, क्लस्टर प्रमुख लॉगिन, गट शिक्षणाधिकारी लॉगिन व शिक्षणाधिकारी लॉगिन या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा : ‘Biotech मध्ये करिअर करण्याची मोठी संधी’; बायोस्किल-२०२६’ परिषदेत तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

हजर, गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद केली जाणार

पटपडताळणीसाठी शाळेस भेट देणारे पथक संबंधित लॉगिनचा वापर करून हजर व गैरहजर विद्याथ्याँची नोंद करणार आहे.
शाळांची पटपडताळणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) चे अधिव्याख्याते, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक तसेच विस्तार अधिकारी आदींचे पथक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन पटपडताळणीची कार्यवाही करणार आहे.

शंभर टक्के उपस्थिती राहिल याची दक्षता घ्यावी

परभणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटपडताळणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे स्थचित शाळांनी विद्याथ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी.

हे देखील वाचा : कर्नाटकात 93 टक्के विद्यार्थ्यांनी निवडली ‘हिंदी’; इंग्रजी, कन्नडनंतर तिसरी भाषेला पसंती

मिशन लक्षवेध अंतर्गत खेळाडू निवड चाचणी

परभणी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मिशन लक्षवेध योजना कार्यन्वित करण्यात येत आहे. मिशन लक्षवेध योजना या माध्यमातून ऑलम्पीक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ खेळ प्रकारामध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे महाराष्ट्र शासनाचे मानस आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यातील खेळ व खेळाडू, कीडा प्रशिक्षण यंत्रणा, कीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धेचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करिअर मार्गदर्शन, खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करणे आहे. सदरची योजना ही त्रिस्तरीय असून प्रत्येकी २० खेळाडूची निवह करण्यात येणार आहे.

Web Title: Student enrollment verification in parbhani district council schools for 2 nd to 12th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • education news
  • maharashtra government school
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Parbhani : परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा ; डिझेल-खत तातडीने उपलब्ध करण्याची मागणी
1

Parbhani : परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा ; डिझेल-खत तातडीने उपलब्ध करण्याची मागणी

School Reopening 2026: यंदा शाळा १५ ऐवजी २६ जूनला सुरू होणार? मंत्री पंकज भोयर यांनी दिलेली माहिती वाचा एका क्लिकवर…
2

School Reopening 2026: यंदा शाळा १५ ऐवजी २६ जूनला सुरू होणार? मंत्री पंकज भोयर यांनी दिलेली माहिती वाचा एका क्लिकवर…

Parbhani News : विमानांसाठी इंधन आहे, मग शेतकऱ्यांसाठी डिझेल का नाही? पेरणीपूर्वी शेतकरी रस्त्यावर
3

Parbhani News : विमानांसाठी इंधन आहे, मग शेतकऱ्यांसाठी डिझेल का नाही? पेरणीपूर्वी शेतकरी रस्त्यावर

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच
4

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.