Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश घेण्याची मुदत १२ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2026 | 04:58 PM
आरटीई प्रवेशासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त

आरटीई प्रवेशासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त

Follow Us
Follow Us:

पुणे : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश घेण्याची मुदत १२ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेली मुदत संपुष्टात येत असल्याने अनेक पालकांकडून मुदतवाढीची मागणी होत होती. त्यानुसार निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना आता ४ जून ते १२ जून या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ही माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

 

राज्यात ‘आरटीई’ प्रवेशासाठी यंदा २ लाख ८९ हजार २८६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित निवड फेरीत ७९ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळाली आहे. याशिवाय प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीत १२ हजार ९५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, दुसऱ्या प्रतीक्षा यादीत ४०५ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे.

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत अद्यापही राज्यभरात १२ हजारहून अधीक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चितीची प्रक्रिया संबंधित शाळांमध्ये निर्धारित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड

‘आरटीई’ प्रवेश दृष्टीक्षेप

एकूण नोंदणी – २,८९,२८६

निवड यादीतील विद्यार्थी – १,०५,८११

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी – ८६,०३४

नियमित निवड फेरी – ७९,७७६

प्रतीक्षा यादी (पहिली) – १२,९५०

प्रतीक्षा यादी (दुसरी) – ४०५

रिक्त जागा – १२,६८०

प्रवेशाची मुदत – १२ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Web Title: Students have been given relief by extending the deadline for rte admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Admission News
  • pune news

संबंधित बातम्या

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…
1

Table Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा! ‘या’ चार खेळाडूंची थेट…

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा
2

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल
3

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
4

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.