Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तालयाच्या भेसळखोरांविरोधातील धडक कारवाईमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीला मोठा आळा बसत असल्याचे चित्र आहे. हॉटेलांमध्येही अनॉलॉग चीजऐवजी शुद्ध पनीर वापरण्याकडे कल वाढला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2026 | 03:20 PM
दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तालयाच्या भेसळखोरांविरोधातील धडक कारवाईमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीला मोठा आळा बसत असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून ब्रँडेड दूध, पॅकबंद पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे हॉटेलांमध्येही अनॉलॉग चीजऐवजी शुद्ध पनीर वापरण्याकडे कल वाढला आहे.

 

गायीच्या दुधाचा खरेदीदर सध्या प्रतिलिटर ३९ रुपयांवर स्थिरावला असून, आगामी श्रावण महिना तसेच गौरी-गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या कठोर कारवाईमुळे भेसळीच्या दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सुट्या स्वरूपात होणाऱ्या पनीरच्या विक्रीत जवळपास ५० टक्क्यांनी घट झाली असून, ग्राहकांचा कल आता ब्रँडेड व पॅकबंद पनीरकडे वळला आहे. परिणामी, पनीरच्या विक्रीत सुमारे ४० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती दुग्ध व्यवसायातील सूत्रांनी दिली.

राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, पूर्वी अनॉलॉग चीजची विक्री प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांदरम्यान होत होती. मात्र, एफडीएच्या कारवाईनंतर या उत्पादनाच्या विक्रीला मोठा आळा बसला आहे. शुद्ध पनीरचा दर प्रतिकिलो ३५० ते ४०० रुपये असून, मिठाई दुकाने, छोट्या डेअऱ्या आणि किरकोळ विक्रेत्यांनीही आता सुट्या पनीरऐवजी ब्रँडेड व पॅकबंद पनीरची विक्री सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा : विठूरायाच्या दारात जवानाची आत्महत्या, महापूजेवेळीच घडला थरार; स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं जीवन

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) दुधाच्या दैनंदिन विक्रीत सुमारे पाच हजार लिटरची वाढ झाली आहे. दर्जेदार उत्पादनांमुळे ग्राहकांची पसंती कायम असून, पनीरच्या विक्रीतही गेल्या महिनाभरात १५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती कात्रज डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली. दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे दूध खरेदीसाठी स्पर्धा वाढत असून, आगामी काळात दूध खरेदीदरात आणखी वाढ होण्याची शक्यता दुग्ध क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Web Title: The sale of adulterated paneer has stopped following the fdas crackdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • FDA Raid
  • pune news
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.