Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी! जयश्रीच्या शिक्षणासाठी पुढाकार; ३० हजारांची मदत

Asmita Law College च्या विद्यार्थ्यांनी जयश्री हेवाळे हिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील जयश्रीच्या शिक्षणासाठी ३० हजारांची मदत देण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत Asmitā Law College च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या उत्कर्ष बालमंदिर, विक्रोळी येथील जयश्री श्रीराम हेवाळे हिच्या पुढील शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

11th admission process : अकरावीला प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा…; काय आहे अंतिम अंतिम मुदत?

विक्रोळीतील कन्नम्मवार नगर परिसरात राहणारी जयश्री ही अत्यंत साध्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहे. तिचे पालक रोजंदारीवर काम करत असल्याने तिच्या शिक्षणाचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत होते. मात्र, अस्मिता विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिची परिस्थिती लक्षात घेत तिला मदतीचा हात दिला. महाविद्यालयात आयोजित ‘आवर्तन’ या सांस्कृतिक कार्यक्रमात जयश्रीने सादर केलेल्या मराठी लावणीने उपस्थितांची मने जिंकली. तिच्या कलेतील आत्मविश्वास, भाव आणि मेहनतीने प्रभावित होऊन विद्यार्थ्यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत आर्थिक मदत उभी केली. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ३०,००० रुपयांची रक्कम शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. या मदतीमुळे जयश्रीच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून तिच्या भवितव्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या उपक्रमात महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील ध्रुविल प्रणील नायर, प्राध्यापक केशव तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अंतिम वर्षाचे विद्यार्थी विनोद विद्यागर, यश गिरी, डॉ. विष्णू बनसोडे, भावीन देडिहा, ऋतुजा कुडेकर आणि इतर विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी मिळून केलेल्या या प्रयत्नामुळे एक सकारात्मक सामाजिक संदेश समाजापुढे ठेवण्यात आला.

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव जपली असल्याचे दिसून येते. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, या भावनेतून त्यांनी गरजू विद्यार्थिनीला मदतीचा हात दिला. त्यांच्या या कृतीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून समाजात सहकार्य आणि संवेदनशीलतेची भावना अधिक बळकट होईल. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अशा सामाजिक जाणीवा असलेल्या तरुण पिढीमुळे समाजात सकारात्मक बदल घडण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Students social commitment taking the initiative for jayshrees education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Student

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
2

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
3

सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ
4

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.