Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारला निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 30, 2025 | 06:40 PM
'टीईटी' निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक (Photo Credit -X)

'टीईटी' निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक (Photo Credit -X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘टीईटी’ निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक
  • सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी
  • मागण्यांवर अनुकूल निर्णय न घेतल्यास आंदोलन

छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे भविष्य अंधारात सापडण्याची भीती निर्माण झारली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारला निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू राज्य शासनाने तेथील साडेतीन लाख शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचा दाखलाही समितीने राज्य सरकारला दिला आहे.

उत्तीर्णची अट लादली

समितीने म्हटले आहे कि, टीईटी बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या पदोन्नत्या रोखण्यात आल्या आहेतु, तर काही ठिकाणी वरिष्ठ निवड श्रेणीसाठीही टीईटी उत्तीर्ण होण्याची अट लादली जात आहे. यासोबतच, इतर मागास बहुजन कल्याण लातूरच्या सहाय्यक संचालकानी पाच वर्षांहून अधिक सेवा झालेल्या आणि ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन काढू नये, अशा आशयाचे पत्र निर्गमित केल्यामुत्रों प्राथमिक शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संताप वसरता आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचा धोका कायम! ३ नोव्हेंबरपासून महापालिका राबवणार व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम

मागण्यांवर अनुकूल निर्णय न घेतल्यास आंदोलन

स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या या अन्यायकारक कारवाईमुळे शिक्षक मानसिक आणि शारीरिक तणावाखाली असल्याचे शिक्षक समितीचे म्हणणे आहे. तातडीने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा. शिक्षण सेवक पद्धती बंद करून पूर्ण वेतनावर नियमित नियुक्ती करावी. पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांच्या मागण्यांची सोडवणूक करावी ऑफलाईन ऑनलाईन कामे बंद करावी. बीएलओ कामातून शिक्षकांची मुक्तता करावी. या मागण्प्यांवर शासनाने तातडीने अनुकूल निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल्याचे समितीने कळवले आहे.

आश्वासनानंतरही शासन सुस्त, दखल नाही

  • ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठ’च्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • मात्र, त्यापूर्वीच १ ऑक्टोबर २०२५ रोजी रविभवन, नागपूर येथे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
  • यावेळी त्यांनी ‘टीईटी’बाबत शासन शिक्षकांच्या बाजूने असून, तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करेल, असे निसंदिग्ध आश्वासन दिले होते.
  • या आश्वासनानंतर संघटनांनी मोर्चा स्थगित केला आणि शासनाला सहकार्याची भूमिका घेतली होती.
  • शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य पदाधिकारी राजन कोरगावकर, राजेश सावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भोयर यांच्या आश्वासनाला एक महिना पूर्ण झाला असूनही, शासनाने अद्याप पुनर्विलोकन याचिका दाखल केलेली नाही, तसेच या संदर्भात कोणताही अनुकूल निर्णय घेतलेला नाही.

अवकाळीचा डबल फटका! एकीकडे पाऊस, दुसरीकडे मजुरांची टंचाई; शेतमाल वाया जाण्याची भीती

Web Title: Teachers are aggressive against the tet decision demand to file a review petition in the supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Exam
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ तयारी पूर्ण; २४ हजार परीक्षार्थींसाठी २३ नोव्हेंबरला ३७ केंद्रांवर व्यवस्था
1

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ तयारी पूर्ण; २४ हजार परीक्षार्थींसाठी २३ नोव्हेंबरला ३७ केंद्रांवर व्यवस्था

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ तारखेला होणार
2

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ तारखेला होणार

Next CJI of Supreme Court: न्यायमूर्ती सूर्यकांत होणार देशाचे पुढचे CJI; हरियाणातील गाव ते SC पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
3

Next CJI of Supreme Court: न्यायमूर्ती सूर्यकांत होणार देशाचे पुढचे CJI; हरियाणातील गाव ते SC पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

टीईटीच्या अंमलबजावणीमुळे नवा वाद; आश्रमशाळांमधील शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
4

टीईटीच्या अंमलबजावणीमुळे नवा वाद; आश्रमशाळांमधील शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.