Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षेदरम्यान तणावाचे वातावरण! आढळली कॉपी तर अनेक विद्यार्थ्यांसाठी जागेचा अभाव

दहावीच्या परीक्षेला सुरुवात होताच पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला धक्का बसला असून राज्यात ११ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2026 | 05:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला तडा गेल्याचे चित्र समोर आले. राज्यभरात ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले, तर सोलापूर जिल्ह्यात तब्बल १० डमी विद्यार्थी आढळून आल्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सावधान! देशातील ३२ विद्यापीठे ‘बनावट’; UGC कडून यादी जाहीर, ‘या’ राज्यात सर्वाधिक फसवणूक

पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात मराठीसह एकूण ९ भाषा विषयांचे पेपर पार पडले. पुणे विभागात सर्वाधिक १० विद्यार्थी कॉपी करताना आढळले, तर नागपूर विभागात १ विद्यार्थी पकडला गेला. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही अशा प्रकारांना आळा बसत नसल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याच्या घोषणांनंतरही प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे.

दरम्यान, मुंबईत परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला. कांदिवलीच्या चारकोप परिसरातील प्रियदर्शिनी विद्यालयात परीक्षा असल्याचे हॉलतिकिटवर नमूद होते. मात्र काही विद्यार्थ्यांची नावे केंद्राच्या यादीत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. जागेअभावी संबंधित विद्यार्थ्यांना दुसऱ्या ज्ञानवर्धिनी विद्यालयात पाठवण्यात आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मानसिक तणाव सहन करावा लागला. विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. “अचानक केंद्र बदलणे योग्य नाही. आधीच स्पष्ट माहिती दिली असती, तर अतिरिक्त ताण टाळता आला असता,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थी प्रथमेश झा याने दिली. तर अवलंब ठाकूर या विद्यार्थ्याने सांगितले की, सुरुवातीला आपले नाव यादीत नसल्याने भीती वाटली, मात्र नंतर दुसऱ्या केंद्रावर सीट मिळाल्याने दिलासा मिळाला.

दुसरीकडे, नाशिक विभागात पहिला पेपर पूर्णपणे कॉपीमुक्त पार पडल्याचे दिसून आले. परीक्षा संपल्यानंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. यामुळे काही ठिकाणी शिस्तबद्ध नियोजन केल्यास कॉपी रोखणे शक्य असल्याचे स्पष्ट होते.

Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात मोठा गैरप्रकार उघडकीस आला. ओळखपत्र तपासणीदरम्यान १० डमी विद्यार्थी आढळून आले. यामध्ये ९ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनीचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी इतरांच्या ऐवजी परीक्षा देण्यासाठी आले होते. हा प्रकार लक्षात येताच केंद्रप्रमुखांनी तत्काळ कारवाई करत पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधितांवर बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. या सर्व घटनांमुळे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिक काटेकोर नियोजन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Web Title: Tension found during examiniation of ssc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Career
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
1

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
2

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
4

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.