Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात कायदे क्षेत्रातील दिग्गजांचा महामेळावा! माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने ५ जुलै २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय कायदेविषयक चर्चासत्र माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात संपन्न झाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 05, 2026 | 07:57 PM
सोलापुरात कायदे क्षेत्रातील दिग्गजांचा महामेळावा!

सोलापुरात कायदे क्षेत्रातील दिग्गजांचा महामेळावा!

Follow Us
Follow Us:
  • सोलापुरात कायदे क्षेत्रातील दिग्गजांचा महामेळावा!
  • माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न
सोलापूर/प्रतिनिधी: सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने रविवार (दि. ५ जुलै) रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय एकदिवसीय कायदेविषयक चर्चासत्र मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून न्यायमूर्ती, विधिज्ञ, बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील तसेच विधी शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने हा कार्यक्रम कायदे क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मेळावा ठरला.

या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भारताचे माजी सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती निजामोद्दीन जे. जमादार, मा. न्यायमूर्ती मिलींद जाधव, मा. न्यायमूर्ती मेहरोज पठाण तसेच माजी न्यायमूर्ती विनय जोशी उपस्थित होते.

यावेळी सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. मनोज शर्मा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. मिलींद थोबडे, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. संग्राम देसाई, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख तसेच सहसचिव ॲड. मीरा प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

चर्चासत्रात न्यायव्यवस्थेतील बदलते प्रवाह, वकिली व्यवसायातील व्यावसायिक नैतिकता, न्यायदान प्रक्रियेत वकिलांची भूमिका, बदलत्या कायदेशीर संकल्पना आणि न्यायव्यवस्थेसमोरील समकालीन आव्हाने या विषयांवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करताना वकिलांनी व्यावसायिक नैतिक मूल्यांची जपणूक करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश वक्त्यांनी दिला.

Solapur News: बाजार समितीत बेदाण्याची विक्रमी आवक! ४०० रुपयांपर्यंत दराची झेप; १५ हजार ४६२ बॉक्स दाखल

कार्यक्रमाच्या प्रारंभी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक करत परिषदेमागील उद्देश स्पष्ट केला. वकिलांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी आणि अद्ययावत कायदेविषयक ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

समारोपावेळी सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी उपस्थित न्यायमूर्ती, न्यायाधीश, बार कौन्सिलचे सदस्य, वकील, प्राध्यापक, विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

या परिषदेस उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ विधिज्ञ, महाराष्ट्रातील विविध जिल्हा व तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील बंधू-भगिनी, विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा स्मृती मंदिर परिसर दिवसभर कायदे क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने गजबजून गेला. उत्कृष्ट नियोजन आणि उच्च दर्जाच्या आयोजनाबद्दल उपस्थितांनी सोलापूर बार असोसिएशनचे विशेष कौतुक केले.

उजनी, भीमाच्या वाढत्या प्रदूषणावर संताप! सुराज्य अभियान आक्रमक; शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Web Title: Solapur bar association organizes state level law conference justice bhushan gavai guidance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Bhushan Gavai
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: वरुणराजाची प्रतीक्षा लांबली! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार
1

Solapur News: वरुणराजाची प्रतीक्षा लांबली! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार

Tea Price Hike: चहाच्या घोटालाही महागाईची उकळी; १० वर्षांनी चहा महागला, आता मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
2

Tea Price Hike: चहाच्या घोटालाही महागाईची उकळी; १० वर्षांनी चहा महागला, आता मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Solapur News: स्मार्ट सोलापूर सिटीवर Dirty चा लागला डाग! अंदाज समितीचा अंदाज; १२७० मीटर रस्त्यावर १५ कोटींचा खर्च
3

Solapur News: स्मार्ट सोलापूर सिटीवर Dirty चा लागला डाग! अंदाज समितीचा अंदाज; १२७० मीटर रस्त्यावर १५ कोटींचा खर्च

AI Video: धक्कादायक! आभासी दुनियेचा विळखा घट्ट; ‘AI’च्या भुलभुलैय्यात चिमुकल्यांची दिशाभूल
4

AI Video: धक्कादायक! आभासी दुनियेचा विळखा घट्ट; ‘AI’च्या भुलभुलैय्यात चिमुकल्यांची दिशाभूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.