Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना मूळ शाळेत परतण्याचे आदेश; मे महिन्याचे वेतन रोखण्याचाही इशारा

निवडणूक तसेच विविध शासकीय कामांसाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत रूजू व्हावे लागणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2026 | 04:19 PM
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; मुलाखतीशिवाय 19 हजार 754 पदांसाठी प्रक्रिया

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; मुलाखतीशिवाय 19 हजार 754 पदांसाठी प्रक्रिया

Follow Us
Follow Us:

पुणे : निवडणूक तसेच विविध शासकीय कामांसाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत रूजू व्हावे लागणार आहे. कार्यमुक्तीचे आदेश दिल्यानंतरही संबंधित शिक्षक मूळ शाळेत रूजू न झाल्यास त्यांचे मे महिन्याचे वेतन अदा करू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना दिल्या आहेत.

 

शासकीय कामांसाठी प्रतिनियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील अनेक शिक्षकांची निवडणूक आणि इतर शासकीय कामांसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यामुळे शाळांतील शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला. यानंतर ९ मे रोजी झालेल्या बैठकीत निवडणूक व अन्य कामांसाठी प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी तातडीने परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधित शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करून मूळ शाळेत रूजू होण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे…

मे महिन्याचे वेतन रोखण्याची दक्षता घ्यावी

परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, क्षेत्रीय कार्यालयांनी दिलेल्या माहितीत नसलेल्या शिक्षकांचीही प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयांमध्ये असल्यास संबंधित कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून त्यांनाही कार्यमुक्त करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच कार्यमुक्तीचे आदेश मिळाल्यानंतरही शिक्षक मूळ शाळेत रूजू झाले नाहीत तर अशा शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन रोखण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात वेतन अधीक्षक आणि भविष्य निर्वाह निधी पथकालाही आवश्यक आदेश देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक व अन्य शासकीय कामांवर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक तसेच मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत रूजू झालेल्या शिक्षकांचा एकत्रित अहवाल ३१ मेपर्यंत शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

Web Title: The education department has announced a major decision regarding teachers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Teachers

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.