Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील शाळांसाठी ‘या’ तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी देण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2026 | 11:49 AM
राज्यातील शाळांसाठी 'या' तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

राज्यातील शाळांसाठी 'या' तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील शाळांसाठी उन्हाळ्याची सुट्टी जाहीर
  • 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार
  • राज्यभरात एकसमान वेळापत्रक
पुणे : एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी देण्यात येणार असून, पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा यंदा एकाच दिवशी सुरू होणार आहेत.

 

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळांमधील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकसमानता आणि सुसंगती राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

या सूचनेनुसार राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र इतर मंडळांच्या शाळांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार वर्ग सुरू असतील किंवा काही महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असतील, तर अशा शाळांमधील सुट्टीबाबतचा निर्णय संबंधित शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर घेण्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विदर्भासह राज्यातील सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत. विदर्भातील उन्हाळ्यातील जास्त तापमानाचा विचार करून तेथील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११. ४५ या वेळेत भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३० जूनपासून शाळा नियमित वेळेत सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : ‘तो सिद्धपुरुष आणि माझा गुरू’, ‘त्या’ आत्मचरित्रामध्ये अशोक खरातचा उल्लेख; पुस्तकात चमत्कारांचे दाखले

राज्यभरात एकसमान वेळापत्रक

यापूर्वी विदर्भातील तापमान आणि उष्णतेमुळे त्या विभागातील शाळा राज्यातील इतर भागांपेक्षा साधारण आठ ते दहा दिवस उशिरा सुरू केल्या जात होत्या. मात्र यंदापासून वेळापत्रकात बदल करून राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनला एकाच दिवशी सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विदर्भात मात्र उष्णतेचा विचार करून सुरुवातीच्या कालावधीत सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची सवलत देण्यात आली आहे. असे गोसावी यांनी सांगितले.

Web Title: The education department has announced summer vacation for schools in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • School news
  • Students

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
2

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
4

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.