'तो सिद्धपुरुष आणि माझा गुरू', 'त्या' आत्मचरित्रामध्ये अशोक खरातचा उल्लेख; पुस्तकात चमत्कारांचे दाखले
खरातने ‘ओसिनॉलॉजी किंवा ब्रह्मांडशास्त्र या विषयात परदेशातून सुवर्णपदक मिळवल्याचे दावे पुस्तकात केले आहेत. खरातने या ‘विद्ये’च्या जोरावर आवारेंचा कारखाना, घर आणि नातेवाईकांच्या भविष्याचा वैध घेतल्याचे आणि त्यांना मार्गदर्शन केल्याचेही म्हटले आहे. याच अधश्रद्धेच्या बळावर खरातने आवारेच्या जीवनात तसेच एमआयडीसीतील उद्योजकामध्ये ‘सर्वोच्च स्थान’ मिळवल्याचे दिसून येते. दरम्यान पुढील काळात नामकर्ण आवारे यांच्या अडवणीत वाढ होण्याची शक्यता असून, पोलीस या ‘गुरू-शिष्य’ नात्याच्या आडून झालेल्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.
२०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या नामकर्ण आवारे यांच्या आत्मचरित्रात खरातवर स्तुतीसुमनं उधळणारा स्वतंत्र मजकूर असल्याचे उघड झाले आहे. या पुस्तकातील पान क्र. १८७ आणि १८८ वर आवारेनी खरातला सिद्धपुरुथ’ महटले आहे. सिद्ध पुरुषाच्या सहवासात या टॉपीकमध्ये
आवारे यांनी कुकर्मा खरातचे गुणगाण गायले आहे. ‘असा मी नामकर्ण’ हे पुस्तक ९ जून २०१२ रोजी प्रकाशीत झाले. पुस्तकाचे लेखक स्वतः आवारेच आहेत. तर प्रकाशक हे नामकर्ण आवारे सुवर्ण महोत्सव २०१२ अभीष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.
एका अपघाताचा उल्लेख करताना आवारे लिहितात की, ११० किमी वेगाने गाडी असूनही खरात यांच्या ‘चमत्कारामुळेच’ आमचे प्राण वाचले, तर खरात साहेब ही व्यक्ती सर्वसाधारण नाही. तर ते सिद्धपुरुष आहेत… मी माझ्या गुरूचे स्थान त्यांना बहाल केले, अशी कबुली त्यांनी दिली आहे. घरातील महत्त्वाचे निर्णय घेताना खरात यांच्याशी साधकबाधक चर्चा केल्याशिवाय आम्ही अंतिम निर्णय घेत नसु, असेही त्यांनी नमूद केले आहे, पोलिसांनी आता खरातच्या निकटवतीयांची यादी तयार केली असून, त्यात नामकर्ण आवारेंचे नाद असल्याचा दावा केला जातो, पुस्तकातील हे संदर्भ तपासासाठी महत्वाचे पुरावे ठरू शकतात. खरातच्या विरोधात पुराव्याची गोळाबेरीज सुरू असतानाच, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी अशा प्रकारे एका संशयित आरोपीचे उदात्तीकरण केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.






