फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत गोपनीय सुरक्षादलांपैकी एक म्हणजे Special Protection Group (SPG). भारताच्या पंतप्रधानांची, माजी पंतप्रधानांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी SPG वर असते. ही नोकरी केवळ प्रतिष्ठेची नाही तर ती जबाबदारी, शौर्य आणि शिस्तीचे प्रतीक देखील आहे. त्यामुळे SPG मध्ये भरतीसाठी प्रक्रिया खूपच कठीण आणि निवडक असते. SPG ही 1985 साली स्थापन करण्यात आलेली एक विशेष सुरक्षा संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. SPG केवळ सर्वोच्च नेतृत्वाची सुरक्षा करत असते, म्हणूनच येथे निवडले जाणारे उमेदवार अत्यंत प्रशिक्षित, विश्वासू आणि मानसिक-शारीरिकदृष्ट्या फिट असले पाहिजेत. SPG मध्ये थेट भरती होत नाही. केवळ IPS, IAS, IRS, CAPF (BSF, CRPF, CISF, ITBP, SSB), आणि आर्मी/नेव्ही/एअर फोर्स मधील अधिकारी यांचीच निवड SPG साठी होते. ही निवड Deputation (म्हणजेच इतर सेवांतून काही काळासाठी SPG मध्ये नियुक्ती) च्या माध्यमातून केली जाते.
SPG साठी पात्रता काय आहे?
उमेदवार केंद्र सरकारच्या सशस्त्र सेवा किंवा पोलीस दलात कार्यरत असावा. त्याचे वय 35 वर्षांखाली असावे. किमान 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. गोपनीयतेचे पालन आणि नैतिकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
SPG मध्ये निवड झाल्यानंतर, उमेदवारांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये खालील बाबींचा समावेश असतो:
SPG कर्मचारी हे Group A Gazetted Officer म्हणून कार्यरत असतात. पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार असतो, शिवाय त्यांना Risk Allowance, Uniform Allowance, Special Duty अल्लोवांचे अशी अनेक अतिरिक्त भत्ते मिळतात. जर तुम्हाला SPG मध्ये करिअर करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही UPSC किंवा CAPF सारख्या परीक्षा उत्तीर्ण करून IPS किंवा इतर सशस्त्र दलात प्रवेश मिळवावा लागतो. त्यानंतर उत्तम कामगिरी, फिटनेस आणि सेवा नोंदीच्या आधारे तुम्हाला SPG मध्ये Deputation साठी निवडले जाऊ शकते.