फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Mechanical Engineering Courses: १२ वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या डोक्यात पहिला विचार कॉम्प्युटर सायन्स (CS) किंवा आयटीचा येतो. परंतु, जर तुम्हाला मशिन्स, गाड्या, विमाने किंवा रोबोट्स डिझाइन करण्यात रस असेल, तर मेकॅनिकल क्षेत्र हा एक उत्तम पर्याय आहे. ऑटोमेशन, इलेक्ट्रिक व्हीकल्स (EV) आणि एआय (AI) मुळे हे क्षेत्र आता पूर्णपणे बदलले आहे.
बी.टेक/बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग: हा ४ वर्षांचा मूळ कोर्स असून यात थर्मोडायनामिक्स, मटेरियल सायन्स आणि मशीन डिझायनिंग शिकवले जाते.
बी.टेक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन/मेकाट्रॉनिक्स: मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा हा मिलाफ आधुनिक उद्योगांची पहिली पसंद आहे.
बी.टेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग: गाड्या आणि इलेक्ट्रिक वाहने (EV) डिझाइन करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे.
डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग: ३ वर्षांच्या या शॉर्ट-टर्म कोर्सनंतर तुम्ही ज्युनिअर इंजिनिअर (JE) बनू शकता.
प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, L&T, गोदरेज आणि महिंद्रा यांसारख्या कंपन्या दरवर्षी मोठी नोकरभरती करतात. सरकारी क्षेत्रात भेल (BHEL), ओएनजीसी (ONGC), रेल्वे, भारतीय सैन्य आणि इस्रो (ISRO)-डीआरडीओ (DRDO) मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर्सना मोठी मागणी असते.
१. मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअर: CAD टूल्सवर मशिन्सचे लेआउट तयार करणे.
२. प्रॉडक्शन इंजिनिअर: फॅक्टरीमधील उत्पादन प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे.
३. रोबोटिक्स इंजिनिअर: ऑटोमेशन आणि रोबोटिक सिस्टीम डिझाइन करणे.
४. क्वालिटी कंट्रोल (QC) इंजिनिअर: उत्पादनांच्या दर्जाची तपासणी करणे.
या क्षेत्रात सुरुवातीचा पगार तुमच्या कौशल्यांवर आणि कॉलेजवर अवलंबून असतो. सामान्य कॉलेजमधून शिक्षण घेतल्यास फ्रेशरला वर्षाला ३.५ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळते. आयआयटी (IIT) किंवा एनआयटी (NIT) सारख्या नामांकित संस्थांमधून उत्तीर्ण झाल्यास हे पॅकेज ८ लाख ते १५ लाख रुपये प्रति वर्ष असू शकते. ५ ते ७ वर्षांच्या अनुभवानंतर वार्षिक पगार १५ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.






