फोटो सौजन्य - Social Media
युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परीक्षा 21 ऑगस्ट ते चार सप्टेंबर च्या दरम्यान आयोजित करण्यात येणार होते पण काही कारणास्तव त्यातील तारखेत थोडे बदल करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 26 तारखेला गोकुळाष्टमी असल्यामुळे त्या दिवशी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. त्या संदर्भात पूर्ण माहिती ugcnet.nta.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येईल.
महत्त्वाची बाब म्हणजे 26 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी परीक्षा 27 तारखेवर ढकलण्यात आली आहे. एकंदरीत 26 ऑगस्ट ला घेण्यात येणारी हिंदी व फिलॉसॉफी ची परीक्षा आता 27 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. यूजीसी नेट परीक्षेची एक्झाम सिटी स्लिप जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षेचे प्रवेश पत्रही लवकरच विद्यार्थ्यांना पुरवण्यात येईल.
हे सुद्धा वाचा : इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर मोहन चौधरी बनले IFS ऑफिसर; बदलीनंतर करण्यात आले सस्पेंड
NTAने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान दोन शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात येईल. पहिली शिफ्टची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल, तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट आयोजित केली जाईल. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, 21 ऑगस्ट 2024 रोजी इंग्रजीची परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेण्यात येईल.
22 ऑगस्ट ला ऍडमिनिस्ट्रेशनची परीक्षा घेतली जाईल. 29 ऑगस्टला दोन्ही शिफ्ट मध्ये इतिहासाची परीक्षा घेण्यात येईल. 3 सप्टेंबरला दोन्ही शिफ्ट मध्ये कॉमर्स तर 4 सप्टेंबरला दोन्ही शिफ्ट मध्ये पॉलिटिकल सायन्स विषयाची परीक्षा घेण्यात येईल. दरवर्षी ज्युनियर प्रोफेसर फेलोशिप तसेच असिस्टंट प्रोफेसर च्या पदांसाठी यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. विशेष गोष्ट म्हणजे यावर्षीपासून पीएचडी ची एंट्रन्स म्हणून यूजीसी नेट परीक्षेतील गुणांचे स्वीकार केले जाईल.