फोटो सौजन्य - Social Media
सरकारी क्षेत्रात चांगला पगार आणि स्थिर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज (ITI) लिमिटेडकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ITI लिमिटेडने यंग प्रोफेशनल्स (YP) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 215 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक व पात्र उमेदवार 12 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. ITI लिमिटेड ही भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून ती टेलिकम्युनिकेशन, डिफेन्स, आयटी आणि नेटवर्किंग क्षेत्रात विविध उत्पादने, सोल्युशन्स आणि सेवा पुरवते. कंपनीच्या बेंगळुरू, मनकापूर, नैनी (प्रयागराज), पलक्कड आणि रायबरेली येथे अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. बेंगळुरूमध्ये स्वतंत्र संशोधन व विकास (R&D) केंद्र असून देशभरात मार्केटिंग सर्व्हिसेस आणि प्रोजेक्ट युनिट्स कार्यरत आहेत. टेलिकम नेटवर्क इन्स्टॉलेशन व कमिशनिंगसाठी ITI कडे स्वतंत्र नेटवर्क सिस्टिम युनिटदेखील आहे.
या भरती मोहिमेत प्रोजेक्ट्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, IS & IT, कॉम्प्युटर लॅब, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, HR, मार्केटिंग, फायनान्स आणि हिंदी सेल अशा विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी ग्रॅज्युएट, B.Tech/BE, ITI, MBA/PGDM आणि PG डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. यंग प्रोफेशनल्स टेक्निशियन आणि जनरलिस्ट पदांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र ITI लिमिटेडमधील अंतर्गत उमेदवारांसाठी ही मर्यादा 45 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात येऊ शकते. पदानुसार शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत देण्यात आली आहे.
ITI लिमिटेडकडून निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाणार आहे.
यंग प्रोफेशनल्स (ग्रॅज्युएट) पदांसाठी निवड दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपोनेंट वेटेज सिस्टीमनुसार शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना ग्रुप डिस्कशन (GD) आणि वैयक्तिक मुलाखत (PI) द्यावी लागेल. टेक्निशियन आणि ऑपरेटर पदांसाठी शॉर्टलिस्टिंगनंतर स्किल टेस्ट घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग देशातील विविध ठिकाणी होऊ शकते. यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, अहमदाबाद, जम्मू-काश्मीर, लेह-लडाख तसेच ईशान्य भारतातील राज्यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता ITI लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट itiltd.in वर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






