फोटो सौजन्य - Social Media
युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) ची परीक्षा भारतातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी भारतातील अनेक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात तसेच परीक्षेला उपस्थित राहतात. इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS), इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) ऑफिसर पदावर निवडून येऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. या स्वप्नपूर्तीसाठी कठोर परिश्रम करून, रात्रीचे दिवस एक करून, विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण करतात आणि सिव्हिल सर्व्हंट पदावर निवडून येतात. यातील अनेक ऑफिसर्स त्यांच्या कारकिर्दीमुळे लोकांच्या मनात एक स्थान निर्माण करतात, परंतु काही ऑफिसर्स असेही असतात जे त्यांच्या कारनाम्यांमुळे कुप्रसिद्ध होतात.
आयएफएस ऑफिसर मोहन चौधरी यांनी 2014 साली युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. मूळचे राजस्थान राज्यातील असलेले मोहन चौधरी हे इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. त्यांच्या सोबत घडलेल्या प्रकरणामुळे सध्या त्यांचे नाव चर्चेत आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर (DFO) पदावर नियुक्त असलेले मोहन चौधरी यांना केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये बदली करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना सस्पेंड केले गेले.
हे सुद्धा वाचा : ITBP मध्ये 819 जागांसाठी मोठी भरती; ‘ही’ असेल अर्ज करण्याची मुदत, आताच करा अर्ज!
या प्रकरणाबद्दल शुक्रवारी केंद्रीय मंत्रालयाने आदेश जारी केला की, IFS ऑफिसर मोहन चौधरी यांना डेप्युटी कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदावर लडाखमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे IFS ऑफिसर मोहन चौधरी यांनी लडाखमध्ये जाऊन त्यांची ड्युटी जॉइन करणे आवश्यक होते. जम्मू-काश्मीरमधून मोहन यांना कार्यमुक्त केले गेले, तरीही त्यांनी लडाखमध्ये ड्युटी जॉइन केली नाही. याशिवाय, जून 2024 मध्ये दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीचे उत्तर असमाधानकारक आणि अपात्र आढळले होते.