चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे, एका माकडाची किंमत २५ लाख रुपये आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Monkey price in China 2026 for research : जगाला ‘कोविड-१९’ च्या संकटात ढकलणारा चीन (China) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. चीनमधील वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सध्या माकडांची अशी काही कमतरता निर्माण झाली आहे की, एका माकडाची किंमत चक्क २५ लाख रुपयांवर (Unit Price of 25 Lakhs) पोहोचली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चिनी औषध कंपन्या आणि सरकारी संस्थांमध्ये प्रयोगशाळेतील माकडे (Experimental Monkeys) खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे.
फायनान्शियल टाईम्स आणि स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१८ पर्यंत या माकडांची किंमत काही हजार रुपयांमध्ये होती. २०२१ मध्ये जेव्हा जगभर लसींचे संशोधन सुरू होते, तेव्हा ही किंमत वाढली होती. मात्र, २०२६ च्या सुरुवातीला चीनने बायोटेस्टिंग (Biotesting) आणि नाविन्यपूर्ण औषध संशोधनावर (R&D) भर दिल्याने मागणीने उच्चांक गाठला आहे. शी जिनपिंग सरकारने चिनी कंपन्यांना जागतिक स्तरावर ‘मेडिकल हब’ बनण्याचे उद्दिष्ट दिले आहे, ज्यासाठी दरवर्षी किमान २५,००० ते ३०,००० माकडांची गरज भासत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen Conflict : तेलसमृद्ध प्रांतासाठी संघर्ष! येमेनच्या रणांगणात Saudi-UAE फुंकणार युद्धाचे रणशिंग
चीनमध्ये माकडांची मागणी वाढण्यामागे केवळ साध्या लसी नाहीत. अहवालानुसार, चिनी शास्त्रज्ञ सध्या कर्करोग (Cancer), अल्झायमर आणि विशेषतः ‘दीर्घायुष्य’ (Longevity Vaccine) देणाऱ्या लसींवर मोठ्या प्रमाणावर प्रयोग करत आहेत. या चाचण्या थेट मानवावर करण्यापूर्वी माकडांवर करणे अनिवार्य असते. माकडांची डीएनए रचना मानवाशी मिळतीजुळती असल्याने, औषध कंपन्या कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहेत.
Chinese scientists have created monkeys with schizophrenia and autism, research that’s shunned in the US and Europe due to ethical concerns https://t.co/z9f2yCphKh — Bloomberg (@business) January 2, 2026
credit : social media and Twitter
चीनमध्ये नैसर्गिक प्रजननाव्यतिरिक्त जैवरासायनिक पद्धतीनेही माकडांची पैदास केली जाते. मात्र, प्रयोगासाठी वापरले जाणारे माकड किमान ३ ते ४ वर्षांचे असावे लागते. सध्या चीनमधील माकडांची संख्या या मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. यामुळेच सरकारने आता सामान्य नागरिकांनाही ‘मंकी फार्मिंग’मध्ये (Monkey Breeding) उतरण्याचे आणि पैदास वाढवण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
२०२१ मध्ये जेव्हा असाच तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा चीनने कंबोडियातून मोठ्या प्रमाणावर माकडांची तस्करी केल्याचे आरोप झाले होते. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जर चीनने आग्नेय आशियाई देशांतून बेकायदेशीरपणे माकडे मागवली, तर वन्यजीव संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्राणी हक्क संघटनांनी (PETA) यावर चिंता व्यक्त केली असून, संशोधनासाठी प्राण्यांचा वापर कमी करण्याची मागणी केली आहे.
Ans: चीनमध्ये कर्करोग आणि नवीन लसींच्या (Vaccine Trials) वैद्यकीय चाचण्यांचे प्रमाण अचानक वाढल्याने आणि माकडांचा पुरवठा कमी असल्याने किमती २५ लाखांवर गेल्या आहेत.
Ans: एका अंदाजानुसार, चीन दरवर्षी औषध आणि लसीच्या चाचण्यांसाठी सरासरी २५,००० ते ३०,००० माकडांचा वापर करतो.
Ans: प्रामुख्याने साऊथ-ईस्ट एशियन मॅकॅक्स (Macaques) आणि आरएच माकडांची मागणी जास्त आहे, कारण त्यांची शारीरिक रचना मानवाशी मिळतीजुळती असते.






