Admit Card कसे कराल डाऊनलोड (फोटो सौजन्य - iStock)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने २५ जून रोजी होणाऱ्या UGC NET परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहेत. ज्या उमेदवारांची या दिवशी परीक्षा आहे ते UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून त्यांचे हॉल तिकिटे डाउनलोड करू शकता. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. ही परीक्षा २५ जूनपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेची सिटी स्लिप आधीच देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून घेऊया.
सिटी स्लिप आधीच जारी
२५ जून रोजी प्रवेशपत्र जारी होण्यापूर्वी, एनटीएने २५, २६ आणि २७ जून रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी यूजीसी नेटची परीक्षा सिटी स्लिप जारी केली होती. उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र कुठे असेल हे कळावे म्हणून परीक्षा शहर स्लिप जारी केली जाते. प्रवेशपत्रात परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता तसेच इतर महत्वाची माहिती असते.
Admit Card कसे डाऊनलोड करावे?
प्रवेशपत्र अर्थात Admit Card डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणून वापरावे लागतील. ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा २५ जून ते २९ जून दरम्यान होणार आहे. इतर परीक्षेच्या तारखांसाठी प्रवेशपत्रे नंतर प्रसिद्ध केली जातील असे सांगण्यात आले आहे. परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी
IIT दिल्लीने सुरू केले नवखे कोर्सेस; सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीसह ५ नवीन अभ्यासक्रम
परीक्षेची वेळ आणि पॅटर्न
युजीसी नेट जून २०२५ ची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.
पहिली शिफ्ट: सकाळी ९ ते दुपारी १२
दुसरी शिफ्ट: दुपारी ३ ते संध्याकाळी ६
या पेपरमध्ये दोन विभाग असतील, दोन्हीमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे, बहुपर्यायी अर्थात मल्टीपल चॉईस प्रश्न असतील.
प्रवेशपत्र डाउनलोड स्टेप्स
खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करून तुम्ही तुमचे UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता:
UGC NET admit card 2025 direct link
बारावी झाला नापास मग विकले दूध, चालवला फावडा अन् आज…; IPS मनोज शर्माची प्रेरणादायी कहाणी