Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Green Card: अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! ग्रीन कार्डसाठी मोजावे लागणार तब्बल ९६ लाख रुपये; ट्रम्प सरकारचा नवा प्लॅन

US Green Card Bond Fee: अमेरिकेत ग्रीन कार्ड घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी ट्रम्प सरकार १ लाख डॉलर (सुमारे ९६ लाख रुपये) चा बाँड अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. याचा भारतीयांवर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 18, 2026 | 05:37 PM
us

us

Follow Us
Follow Us:

US Green Card Bond Fee: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार भारतीयांसह सर्व परदेशी कर्मचाऱ्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे, ज्यांना देशात कायमस्वरूपी राहण्यासाठी ‘ग्रीन कार्ड’ची गरज आहे. ट्रम्प सरकार परदेशातून अर्ज करणाऱ्या काही ग्रीन कार्ड आवेदकांसाठी १ लाख डॉलर (सुमारे ९६ लाख रुपये) पर्यंतचा बाँड जमा करणे अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. हा नियम भारतातून अर्ज करणाऱ्या भारतीयांवरही लागू होणार आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका वृत्तानुसार, या प्रस्तावावर सध्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय चर्चा करत आहे.

हा प्रस्ताव कायदेशीर इमिग्रेशन अधिक कडक करण्याचा आणि नवीन स्थलांतरित आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतील, हे सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ही बातमी समोर आल्यापासून, जे लोक अमेरिकेचे ग्रीन कार्ड घेण्याच्या तयारीत होते, ते सर्वजण चिंतेत आहेत. ट्रम्प सरकारने गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारचे अनेक कडक निर्णय घेतले आहेत.

ग्रीन कार्डशी संबंधित ‘बाँड’ म्हणजे काय?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय काही इमिग्रंट व्हिसा (ग्रीन कार्ड) अर्जदारांना अमेरिकेत प्रवेश देण्यापूर्वी बाँड जमा करण्यास सांगण्याचा विचार करत आहे. हा नियम केवळ अशाच लोकांवर लागू करण्याची चर्चा सुरू आहे, जे अमेरिकेबाहेर असलेल्या अमेरिकन दूतावास किंवा वाणिज्य दूतावासांद्वारे अर्ज करत आहेत. अधिकारी हा एक ‘पायलट प्रोग्राम’ (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून लॉन्च करण्याचा प्लॅन करत आहेत. सुरुवातीला काही देशांमध्ये हा नियम लागू केला जाऊ शकतो; सध्या यावरही चर्चा सुरू आहे.

Skyroot Aerospace: इस्रोच्या जोडीदाराची अंतराळात मोठी भरारी; त्यांनी उभारलेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ ची यशोगाथा एकदा वाचाच

बाँडची ही फी तेव्हाच परत केली जाईल, जेव्हा ग्रीन कार्ड मिळालेली व्यक्ती अमेरिकेची नागरिक बनेल. या संपूर्ण प्रक्रियेला सामान्यतः ५ वर्षे लागतात. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये असेही नमूद केले आहे की, कुटुंबातील सदस्य देखील अर्जदारांच्या वतीने हा बाँड जमा करू शकतात.

भारतीय कर्मचाऱ्यांसाठी याचे काय परिणाम होतील?

हा प्रस्ताव थेट त्या भारतीय कर्मचाऱ्यांना प्रभावित करू शकतो, जे रोजगार-आधारित ग्रीन कार्डच्या माध्यमातून अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य (Permanent Residency) करू इच्छितात. सध्या रोजगार-आधारित ग्रीन कार्ड श्रेणीमध्येच सर्वात जास्त प्रतीक्षा वेळ (वेटिंग टाईम) आहे. अनेक भारतीय कर्मचारी असे आहेत, जे ग्रीन कार्डसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांना कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागत आहे, कारण रोजगार-आधारित ग्रीन कार्डवर प्रत्येक देशासाठी एक मर्यादा निश्चित केलेली आहे.

जर त्यांना भारतात येऊन ग्रीन कार्डची प्रक्रिया पूर्ण करावी लागली, तर त्यांना ही बाँड फी द्यावी लागू शकते. असे झाल्यास इमिग्रेशनच्या लांबच लांब रांगेत उभे असलेल्या भारतीयांवर आर्थिक बोजा प्रचंड वाढू शकतो. ही अनिश्चितता अशा वेळी आली आहे जेव्हा दरवर्षी हजारो भारतीय अमेरिकेचे नागरिक बनत आहेत.

NEET Result: नीट परीक्षेचा घोळ संपेना! बीडमध्ये सोहम आणि ज्ञानेश्वरीच्या ‘आन्सर की’ आणि गुणपत्रिकेत मोठी तफावत

DHS च्या आकडेवारीनुसार, अमेरिकन नागरिकत्व मिळवलेल्या भारतीयांची संख्या:

वित्त वर्ष २०२२: ६५,९६० भारतीय

वित्त वर्ष २०२३: ५९,१०० भारतीय

वित्त वर्ष २०२४: ४९,७०० भारतीय

नजीकच्या वर्षांत या संख्येत घट झाली असली, तरी नवीन अमेरिकन नागरिकांसाठी भारत हा दुसरा सर्वात मोठा स्रोत देश बनून राहिला आहे. एकूणच, जर ही नवीन फी लागू झाली तर त्याचा थेट फटका भारतीयांच्या खिशाला बसणार आहे.

Web Title: Us green card new bond fee rules donald trump government indian workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • America
  • bond
  • green

संबंधित बातम्या

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय
1

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ
2

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
3

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या
4

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.