फोटो सौजन्य - Social Media
SBI ने अधिसूचना जाहीर केली आहे. क्लार्क पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. १७ डिसेंबरपासून या भरतीला सुरुवात करण्यात येणार आहे. तर ७ जानेवारी २०२४ पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी आरजू करता येणार आहे. क्लार्कच्या एकूण १३,७३५ पदांसाठी या भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. स्त्री आणि पुरुष दोन्ही या पदांसाठी अर्ज करू शकतात. पदांची संख्या राज्यवार आधारित आहे. या संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवारांना याचा आढावा घेता येणार आहे, तसेच या भरती संदर्भात सर्व गोष्टी जाणून घेता येणार आहेत.
या भरतीसाठी अर्ज कर्त्या उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. अधिसूचनेमध्ये या अटी शर्ती नमूद आहेत. एकंदरीत, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवार संबंधित क्षेत्रामध्ये पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसंदर्भात काही बाबी नमूद होते. किमान २० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज ककरता येऊ शकते. तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षे आयु निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना ७५० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. तर OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही सारखी रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. तर SC, ST तसेच दिव्यांग प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क ठेवण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. एकंदरीत, चार टप्प्यांच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रथम लिखित परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेचा समावेश आहे. दस्तऐवजांची पडताळणी करत उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
अशा प्रकारे करता येणार अर्ज: