Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटीच्या अतिरिक्त जागांचा विकास करताना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला पाहिजे; श्रीरंग बरगे यांचे वक्तव्य

एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा पीपीपी (PPP) तत्त्वावर विकास करताना केवळ विकासकांचा फायदा न होता, एसटीला कायमस्वरूपी उत्पन्नाचा मजबूत स्त्रोत मिळणे आवश्यक आहे,असा विश्वास युनियन नेते श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 17, 2026 | 07:00 AM
एसटीच्या अतिरिक्त जागांचा विकास करताना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला पाहिजे; श्रीरंग बरगे यांचे वक्तव्य
Follow Us
Follow Us:

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास करताना केवळ विकासकांचे उखळ पांढरे न होता, त्यातून एसटीसाठी कायमस्वरूपी  उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निर्माण झाला पाहिजे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.

राज्य मंत्रिमंडळाने एसटीच्या अतिरिक्त जमिनी पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यास मंजुरी दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना बरगे म्हणाले की, सार्वजनिक-खाजगी भागीदारी ही केंद्र सरकारची संकल्पना असून वरवर पाहता ही योजना सकारात्मक वाटते मात्र ती राबवताना योग्य काळजी न घेतल्यास मूळ उद्देश लांब राहून केवळ विकासकांचे उखळ पांढरे होईल का अशी शंकाही निर्माण होते.

Pratap Sarnaik: महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू! Ola-Uber-Rapidoसाठी नवे नियम, चालकांना किमान 80% भाड्याची हमी

गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही या योजनेमुळे एसटी प्रवासी आणि कर्मचारी या दोघांचाही लाभ होणार असेल, तर ती एसटीसाठी संजीवनी ठरली पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत एसटीच्या प्रवासी उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण केल्याशिवाय एसटीचा विकास आणि विस्तार शक्य होणार नाही, असे असले तरी पूर्व इतिहास पाहिला तर अशा योजनांच्या माध्यमातून एसटीच्या जमिनीवर विकासकांनी १०० वर्षासाठी डल्ला मारता कामा नये. ही योजना उभयतांना उभारी देणारी ठरवी, ही अपेक्षा आहे.

सध्या कर्मचारी आणि एसटीची मिळून ७,००० कोटी रुपयांहून अधिक वैधानिक देणी प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या देण्यांबाबत सरकार केवळ घोषणा करत असून प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल…

बरगे म्हणाले की, प्रवासी उत्पन्नाबरोबरच इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे वेतन व भत्ते वेळेवर मिळण्यासाठी पडिक अतिरिक्त जमिनींचा नियोजनबद्ध विकास करून त्यातून उत्पन्न मिळविणे हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मात्र हे करताना राज्य सरकारने एसटीचे हित जपले पाहिजे.

प्रवासी असले तर एसटी आहे, त्यामुळे त्यांना चांगल्या सोयी सुविधा आणि वक्तशीर सेवा मिळायला हवी. पीपीपी योजनेअंतर्गत आधुनिक बसस्थानके उभारून प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्याचबरोबर व्यापारी आस्थापनांमधून मिळणारे नियमित भाडे एसटीसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत ठरू शकते. मात्र, ही योजना राजकीय हस्तक्षेपापेक्षा प्रामाणिक हेतूने आणि पारदर्शकपणे राबविणे आवश्यक आहे. या योजनेतून एसटीला जास्तीत जास्त प्रीमियम मिळावा, तसेच विकसित होणाऱ्या आस्थापनांमधून दीर्घकालीन आणि भरघोस भाडे मिळेल, याची काळजी घेतल्यास एसटी आणि कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वासही बरगे यांनी व्यक्त केला.

Web Title: Msrtc ppp land development revenue source

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • MSRTC Bus
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी
4

ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.