Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…

बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळांनी कडक बंदोबस्त केला आहे. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2026 | 05:42 PM
SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…
Follow Us
Follow Us:

उद्यापासून सुरू होणार दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 
५०० मिटर अंतरावरील झेरॉक्सची दुकाने बंद
परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त

सोनाजी गाढवे /पुणे:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा आज पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी (Career) नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ८७९ विद्यार्थी वाढले आहेत. बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे राज्य मंडळासमोर आव्हान आहे.

त्यामुळे यंदा पाच हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी पाच हजार १३० परीक्षा केंद्रे होती. मात्र, गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर केलेल्या कारवाईमुळे ३१ परीक्षा केंद्रे रद्द करण्यात आली.

SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. ‘परीक्षार्थ्यांनी नेमून दिलेल्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.

गैरप्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त

बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळांनी कडक बंदोबस्त केला आहे. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विभागीय मंडळांमार्फत विशेष पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठी पथके, पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे डॉ. बेडसे यांनी सांगितले.

SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ सुरू; ‘कॉपीमुक्त अभियान’ अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित…

झेरॉक्सची दुकाने बंद

शिक्षण विभागाच्या नऊ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता समितीची जबाबदारी आणि कार्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील छायाप्रती काढून देणारी (फोटोकॉपी) दुकाने बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विभागीय मंडळनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी

पुणे – २,७८,१४५
नागपूर – १,५३,८९०
छत्रपती संभाजीनगर – १,९१,१५२
मुंबई – ३,४९,८७३
कोल्हापूर – १,३२,८०८
अमरावती – १,६५,३१८
नाशिक – २,६,६३६
लातूर – १,११,८८
कोकण – २५,७७९
एकूण – १६,१५,४८९

दोन वर्षाची आकडेवारी

वर्ष २०२४-२५ – २०२५- २६
विद्यार्थी – ८,६४,१२०- ८,६५,७४०
विद्यार्थिनी- ७,४७,४७१ – ७,४१,७३६
तृतीयपंथी – १९ – १३
एकूण- १६,११,६१० – १६,१५,४८९

Web Title: Xerox center closed stop copy deployed team career maharashtra ssc board exam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • Career News
  • SSC

संबंधित बातम्या

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
1

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
2

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
3

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
4

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.