Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government School Crisis: सरकारी शाळांचे अस्तित्व धोक्यात? पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांवर दारोदार फिरण्याची वेळ का आली?

Government School Crisis: दरवर्षी जून महिन्यात शाळांच्या प्रांगणात दिसणारी चिमुकल्यांची लगबग यंदा गायब का झाली आहे? नाशिकच्या येवला तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणामुळे जिल्हा परिषद आणि शासकीय अनुदानित शाळांसमोर अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 05:25 PM
अनुदानित आश्रमशाळांची रोस्टर पडताळणी होणार; 5 जुलैचा अंतिम अल्टिमेटम

अनुदानित आश्रमशाळांची रोस्टर पडताळणी होणार; 5 जुलैचा अंतिम अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:
  • पालकांमध्ये इंग्रजी शाळांचे आकर्षण
  • खाजगी शाळांकडून जाहिरातींचा वापर
  • शासकीय कामांचा ‘स्मार्ट’ वापर
Government School Crisis in Yeola: दरवर्षी जून महिन्यामध्ये शाळांच्या प्रांगणात चिमुकल्यांची लगभग दिसायची. नवीन वर्ग, नवीन पुस्तके, मित्र-मैत्रिणी यांचे कमालीचे आकर्षण असायचे. त्यावेळी विद्यार्थ्यांची कमतरता भासत नव्हती. परंतु, यंदा बहुतांश शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी झालेली दिसते आहे. अनेक शिक्षकांना विद्यार्थी मिळवण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे. अगदी अशीच वेळ येवला तालुक्यातील शिक्षकांवर आली आहे.

बदलत्या काळानुसार शिक्षणाचे खाजगीकरण झाले आहे. ग्रामीण भागांमध्येही इंग्रजी शाळांचे आकर्षण वाढत आहे. पालकांच्या अपेक्षा अलीकडे बदलल्या असून आता आपल्या मुलांना आधुनिक सुविधा, इंग्रजी संवाद कौशल्य आणि स्पर्धात्मक वातावरण मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. परिणामी सरकारी शाळांची स्थिती अतिशय दयनीय होत आहे.

NEET UG Re-Exam: परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध? विद्यार्थ्यांची फसवणूक तर होत नाही ना?

शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू

येवला तालुक्यात अनेक खाजगी शाळांची वाहने जाहिरातीसाठी गावोगावी फिरताना दिसत आहेत. विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमाकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद आणि शासकीय अनुदानित शाळाही मागे राहिलेल्या नाहीत. शाळांचे अस्तित्व आणि स्वत:ची पदे टिकवण्यासाठी कडाक्याच्या उन्हात शिक्षकांकडून पालकांना शासकीय शाळांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधाबद्दल माहिती दिली जात आहे. या सर्व प्रयत्नानंतर आता पालकांचे मत परिवर्तन होते का? हे पहावे लागेल.

Teachers Adjustment: मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना ठाणे, पालघरला पाठवणार? शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर शिक्षकांमध्ये संताप का?

शासकीय कामांचा ‘स्मार्ट’ वापर

सध्या शिक्षकांना जणगणना आणि इतर शासकीय कामांच्या निमित्ताने घरोघरी जावे लागत आहे. या संधीचा स्मार्ट वापर सरकारी शाळेतील शिक्षक करत आहेत. शासकीय माहिती गोळा करत गुरुजी आपल्या शाळेच्या गुणवत्तेची आणि वैशिष्ट्यांची मार्केटिंग देखील करत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामागे शाळेचे अस्तित्व, शिक्षकांची पदे आणि संस्थेचे भवितव्य जोडलेले असल्याने ही स्पर्धा आता अधिक प्रतिष्ठेची बनली आहे.

Web Title: Yeola taluka government school student enrollment crisis teachers door to door

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Alert Schools
  • bmc school
  • Teacher
  • Teacher Job

संबंधित बातम्या

Teachers Day Wishesh: गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल! शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
1

Teachers Day Wishesh: गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल! शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय
2

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल
3

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत
4

Bharati Vidyapeeth: भारती विद्यापीठात प्राध्यापक होण्याची सुवर्णसंधी! ‘या’ महाविद्यालयांत ३२ जागांसाठी थेट मुलाखत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.