फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET 2026 paper leak : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची चौकशी अजून पूर्ण झालेली नसताना आता अगामी पेपरफुटीची चर्चा सर्वेत्र होत आहे. नीट युजी री-एग्जामचा (NEET UG Re-Exam) पेपर लीक झाल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर अनेक पोस्ट असा दावा करत आहेत की, एका खाजगी टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून नीट री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावर एनटीएने नेमके काय उत्तर दिले आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सोशल मीडिया ‘एक्स’ वर @PRINCESHRI43069 नावाच्या एका अकांऊंटवरून नीट यूजी री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणी ‘सायबर दोस्त’ आणि ‘एनटीए’ कडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘प्रिय @NTA_Exams आणि @Cyberdost, मला काही टेलिग्राम पेजेस सापडली आहेत.
जी व्यक्ती चालवत आहे, त्या लिंक्स => https://t.me/+XEOSuf_meIVjNDJl (खाजगी ग्रुप), दुसरी https://t.me/reneetleakpaper2026, तिसरी https://t.me/+YTHud1TLvphjMDc1 NEET2026 च्या प्रश्नपत्रिका विकत आहेत. कृपया यावर कारवाई करावी.
या पोस्टला उत्तर देताना एनटीएने लिहले आहे की, शहानिशा आणि कारवाई करण्यासाठी सायबर क्राईम विभागाला माहिती दिली जात आहे. यावरून स्पष्ट झाले की, टेलिग्रामच्या माध्यमातून नीट री-एग्जामच्या प्रश्नपत्रिका लीक केल्या जात असल्याची माहिती एनटीएनेला मिळाली आहे.
या प्रकरणावर तपास सध्या सुरू असून एनटीएने अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण NEET 2026 री एग्जामच्या प्रश्नपत्रिकेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाऊ शकते. अशा अफवांमुळे विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आता एनटीए या आव्हानाचा सामना करत असून आता विद्यार्थ्यामधील विश्वास टिकवून ठेवते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






