Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

RTI : पश्चिम मुंबईतील वांद्रे ते दहिसर परिसरातील सुमारे 185 माध्यमिक शाळांची 2024-25 आणि 2025-26 या दोन शैक्षणिक वर्षांत तपासणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या माहितीनंतर हा मुद्दा समोर आला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 14, 2026 | 07:25 PM
RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  •  पश्चिम मुंबईतील सुमारे 185 शाळांच्या तपासणीबाबत गंभीर आरोप
  • विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळांतील सुविधा आणि अनुदानाच्या वापराच्या पडताळणीचा प्रश्न
  • संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि सात दिवसांत विशेष तपासणीची मागणी
पश्चिम मुंबईतील वांद्रे ते दहिसर परिसरातील सुमारे 185 माध्यमिक शाळांची 2024-25 आणि 2025-26 या दोन शैक्षणिक वर्षांत तपासणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या माहितीनंतर हा मुद्दा समोर आला असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ग्लोबल पेरेंट्स टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दंडवते यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल केली आहे. पश्चिम मुंबईतील माध्यमिक शाळांच्या तपासणीबाबत आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याचा मुद्दाही या प्रकरणात उपस्थित करण्यात आला आहे.

शाळांच्या तपासणीची जबाबदारी कोणाची?

शाळा संहितेतील नियम आणि शासन निर्णयांनुसार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांची नियमित तपासणी करणे अपेक्षित आहे. शिक्षण निरीक्षकांनी वर्षाला 10 ते 15, तर उपनिरीक्षकांनी 25 ते 30 शाळांची तपासणी करावी, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित कालावधीत शाळांची तपासणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Accident News: ‘हेल्प… हेल्प…’च्या आर्त हाका! इम्पेरियल हाइट्सच्या आगीत दोन महिलांचा मृत्यू

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

शाळांच्या तपासणीदरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छतागृहे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या, विद्यार्थी पटसंख्या, भौतिक सुविधा आणि शाळांना मिळणाऱ्या अनुदानाच्या वापराची पडताळणी महत्त्वाची असते. तपासणी झाली नसल्यास या सुविधांच्या स्थितीबाबत प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमित तपासणीची मागणी करण्यात येत आहे.

‘बाल दृष्टी’मधून नेत्रआरोग्याला दृष्टी! ३ वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांतील ३ लाख विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणीचे उद्दिष्ट

सात दिवसांत विशेष तपासणीची मागणी

या प्रकरणी शिक्षण निरीक्षक (पश्चिम) संजय जावीर आणि संबंधित उपनिरीक्षकांवर कारवाई करावी, तसेच सात दिवसांच्या आत सर्व संबंधित शाळांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. आता शिक्षण विभाग या आरोपांवर काय भूमिका घेतो आणि तपासणीचे अधिकृत अभिलेख काय सांगतात, याकडे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा मुद्दा कोणत्या परिसरातील शाळांशी संबंधित आहे?

    Ans: पश्चिम मुंबईतील वांद्रे ते दहिसर परिसरातील सुमारे १८५ माध्यमिक शाळांशी संबंधित आहे.

  • Que: तपासणी न झाल्याचा आरोप कोणत्या कालावधीसाठी आहे?

    Ans: २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी हा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: तक्रारदारांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून सात दिवसांत विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Mumbai west schools no inspection rti claim rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • bmc school
  • CM Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

Maharashtra News : राज्यात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणार! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘लिव्हिंग लॅब’ ची सुरुवात
1

Maharashtra News : राज्यात आरोग्यसेवेचा दर्जा सुधारणार! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘लिव्हिंग लॅब’ ची सुरुवात

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
2

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.