File Photo : Crime
लाखनी : शहरालगत एका गावातील अल्पवयीन मुलाने नात्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवले. हा प्रकार सातत्याने घडल्याचे सांगितले जात आहे. यातूनच अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 1) उघडकीस आली. वैद्यकीय तपासणीमुळे या घटनेचे बिंग फुटले. या सर्व प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : खळबळजनक ! भूतबाधेच्या नावावर एकाच कुटुंबातील चौघींवर अत्याचार; वृद्धेलाही सोडलं नाही, अडीच वर्षांनंतर प्रकार उघडकीस
याप्रकरणातील अल्पवयीन पीडिता व विधिसंघर्षग्रस्त मुलगा हे एकाच गावचे असून, एकमेकांचे नातेवाईक आहेत. पीडित मुलीची मासिक पाळी थांबल्याने गुरुवारी (दि.29) पीडितेच्या आईने तिला लाखनी येथील रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून अल्पवयीन मुलगी मागील तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकून पीडितेच्या आईला धक्काच बसला. अखेर आईने मुलीची कसून विचारपूस केली असता एप्रिल व मे 2024 मध्ये आरोपीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तिने कबुली दिली.
डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल तथा पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून लाखनी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मुलगी गर्भवती असल्याची माहिती मिळताच…
आपली मुलगी गर्भवती असल्याचे समजताच पीडित मुलीच्या आईला मोठा धक्काच बसला. मुलीने हा प्रकार घरी सांगितला नसल्याचे हे सर्व घडले. मात्र, डॉक्टरांकडे गेल्यावर हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने मुलीकडे सखोल चौकशी केली. तेव्हा या पीडित मुलीने घडला प्रकार सांगितला.
दोन महिन्यांपासून सुरु होता प्रकार
पीडित मुलीच्या आईने मुलीची कसून विचारपूस केली असता तिने अत्याचाराची माहिती दिली. त्यामध्ये तिने एप्रिल व मे 2024 या दोन महिन्यात आरोपीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन्…