File Photo : Crime
वरूड : धाकट्या भावाने थोरल्या भावावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. ही घटना शनिवारी (दि.31) रात्री साडेअकराच्या सुमारास बेनोडा शहीद येथे उघडकीस आली. प्रशांत लक्ष्मण घोरसे (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अजय लक्ष्मण घोरसे (वय 42) याच्याविरुद्ध हत्येच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
हेदेखील वाचा : खळबळजनक ! भूतबाधेच्या नावावर एकाच कुटुंबातील चौघींवर अत्याचार; वृद्धेलाही सोडलं नाही, अडीच वर्षांनंतर प्रकार उघडकीस
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची चौकशी पोलिस करत आहेत. शनिवारी रात्री प्रशांत हा मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर तो शिवीगाळ करत होता. त्यामुळे लहान भाऊ अजयने त्याला हटकले आणि शिवीगाळ करू नको, असे समजाविण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, तो ऐकत नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये वाद उफाळून आला. अशातच अजयने प्रशांतवर चाकू हल्ला केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि प्रशांतचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच भावाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : गुंडांनो खबरदार! गणेशोत्सवात महिलांची छेडछाड काढल्यास पुणे पोलीस देणार ‘ही’ लाजिरवाणी शिक्षा