crime (फोटो सौजन्य: social media )
नवी मुंबई: नवीन पनवेल येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय मुलीच्या डोक्यात, चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला वजनदार वस्तूने मारहाण करून तिच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही हत्या दुसरं तिसरं कोणी नाही तर तिच्या काकानेच केली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान तळोजा येथे घडली आहे.
तळोजा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी रवाना झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून नवी मुंबईतील तळोजामध्ये घरगुती वादातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा फेज २ मधील आसावरी सोसायटीमध्ये १७ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. आई-वडील कामावरून घराकडे परतल्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूने तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तळोजा पोलिसांनी तपास केला असता गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती असल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबई पोलिसांची धडक मोहीम; अमली पदार्थ तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई
राज्य शासनाने अमली पदार्थांची निर्मिती तस्करी तथा विक्री करणाऱ्या टोळ्यांवर, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची दुरुस्ती केल्यावर, नवी मुंबई पोलिसांनी तब्बल 6 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील 6 ही आरोपी सध्या कारागृहात असून, त्यांच्यावर मकोका कलम लावल्याने पोलीस त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे.
नशा मुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत, नवी मुंबई पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. तसेच राज्य शासनाने अमली पदार्थांची तस्करी विक्री तसेच सेवन करणाऱ्याटोळ्यांवर सुधारित महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ संबंधित टोळीअंतर्गत मकोका गुन्हा दाखल केला आहे. अमली पदार्थ संबंधित टोळ्यांवर कारवाई करणारे नवी मुंबई पोलीस हे पहिले पोलीस दल ठरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पुण्यातील आयटी इंजिनिअर दाम्पत्याची फसवणूक; तब्बल सव्वा कोटींना घातला गंडा