राज्य शासनाने अमली पदार्थांची तस्करी विक्री तसेच सेवन करणाऱ्याटोळ्यांवर सुधारित महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात होणाऱ्या ड्रग्स तस्करीची गंभीर दाखल घेतली आहे.
पंजाबमधील खदूर साहिबमध्ये एका १९ वर्षीय तरुणाचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. डॉक्टरांच्या तपासणीत असे दिसून आले की त्या तरुणाच्या गुप्तांगात औषधाचे इंजेक्शन देण्यात आले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
अमली पदार्थावर निबंध व विक्रेत्यांवर कठोर कारवाईसाठी पलूसकर रस्त्यावर उतरले आहेत. सकाळी नऊ वाजता कुंडल वेसपासून शिवतीर्थापर्यंत सर्वपक्षीय फेरी काढण्यात आली.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मुंढवा परिसरात छापा कारवाई करून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला.
ड्रग्जमुक्त युवा पिढीसाठी शिवाजी रायगड स्मारक मंडळ, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारत आदी संघटनांच्या वतीने कोथरुड मधील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली.
शहरात ड्रग्ज सप्लायरचे जाळे मोठ्याप्रमाणात वाढले आहे. या सप्लायरवर पुणे पोलिसांची नजर असली तरी ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहच होत असल्याचेही दिसून आलेले आहे.